BREAKING NEWS:
संपादकीय हेडलाइन

धार्मिक अंधश्रद्धा विरुद्ध पेटून उठलेले युगप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले

Summary

उपेक्षित शूद्रांना अर्थातच कुणबी ,माळी,धनगर,सोनार,सुतार आदी बहुजनांना उच्च वर्णीयांनी देवाच्या नावावर लादलेल्या धार्मिक अंधश्रद्धा ,भटांनी पोट भरण्यासाठी करायला लावलेले धार्मिक संस्कार व जातीवादाच्या गुलामगिरीतुन बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे समजावून सांगण्यासाठी गुलामगिरी(1873)* शेतकऱ्याचा असूड*(1883),*सार्वजनिक सत्यधर्म** *छत्रपती शिवाजी महाराज […]

उपेक्षित शूद्रांना अर्थातच कुणबी ,माळी,धनगर,सोनार,सुतार आदी बहुजनांना उच्च वर्णीयांनी देवाच्या नावावर लादलेल्या धार्मिक अंधश्रद्धा ,भटांनी पोट भरण्यासाठी करायला लावलेले धार्मिक संस्कार व जातीवादाच्या गुलामगिरीतुन बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे समजावून सांगण्यासाठी गुलामगिरी(1873)* शेतकऱ्याचा असूड*(1883),*सार्वजनिक सत्यधर्म** *छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा** (जून1869),*ब्राम्हणांचे कसब*(1869) आदी ग्रंथसंपदा लिहून शूद्रांना जागृत करणान्यासाठी माना सन्मान तथा जीवाची पर्वा न करता कठीण परिश्रम घेतलेत, त्यासोबत शूद्रांना व अतिशूद्रांना जीवनाशयक प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून शाळा उघडणारा ,*हंटर शिक्षण आयोगापुढे* 19ऑक्टोबर1882 मध्ये त्यांनी आपले निवेदन देताना, *प्राथमिक* शिक्षण कसे महत्वाचे आहे ते साध्य करण्यासाठी शेतकरी वर्गातूनच शिक्षक नेमावा असा आग्रह करणारा ,
शिक्षकासाठी पात्रतेची अट घालणारा,प्रशिक्षण व पगार ह्याची क्रमबद्ध मांडणी करणारा,स्त्री शिक्षणावर व स्त्रिला धार्मिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी विशेष भर देणारा ,अभ्यासक्रमात शेतीचे प्राथमिक ज्ञान, हिशोबमाहिती ,नीती आणि आरोग्य, भूगोल,लेखन वाचन आदी व्यवहारपयोगी शिक्षण देण्याचा आग्रह करणारा व शूद्र,अतिशूद्राना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,बक्षिसे व प्रलोभने द्यावीत असा आग्रह करून , शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकारने सांभाळावी व *कुठलेही शिक्षण खाजगी यंत्रणेकडे सोपविणे इष्ट नाही* असा युक्तिवाद करणारा तसेच *वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे* अशा वास्तव सूचना ब्रिटिशांना देणारा ह्याहीपुढे जाऊन *शूद्र हाच राष्ट्राचा खराखुरा पोशिंदा आणि आधारस्तंभ आहे* असे रोखठोक मत मांडणारा महापुरुष,एक महान प्रज्ञावंत शिक्षणतज्ञ,बहुजन शेतकऱ्यांचा खरा कैवारी महात्मा जोतिबा फुले होय. धार्मिक अंधश्रद्धेवर आधारित ग्रंथ उच्च वर्णीयांनी स्वतः निर्माण करून ते ग्रंथ देवांनी लिहुन ठेविले असे दाखवून त्याला दैविक रूप देऊन वर्णव्यवस्था बहुजनांना स्वीकारण्यास बाध्य केले, अशा अमानवी जातीवर आधारित अमानवी चातुरवर्णव्यवस्था मोडीत काढण्यासाठी विद्रोह करणारे महान मनोवैज्ञानिक महात्मा जोतीबा फुले होत तसेच ब्रिटिश काळात धार्मिक अंधश्रद्धा व जातीयता समाप्त करण्यासाठी कृतिशील विद्रोह करणारा खरा महात्मा होय.बहुजन समाज शिक्षण घेऊन धार्मिक अंधश्रद्धेतुन बाहेर पडेल हा त्यांचा आशावाद होता,परंतु तसे होताना दिसत नाही ,शूद्र अर्थात बहुजनातील बहुतांशी *डॉक्टर,वकील , अभियंता,अधिकारी, प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक इत्यादी तसेच पीएचडी धारकसुध्दा ,कला , विज्ञान ,साहित्य,वाणिज्य , * शिकलेले ,सोबतच वैद्यकीय, अभियांत्रिकी व कॉम्पुटर शिकलेले सुद्धा आधुनिक साधनांचा वापर करून धार्मिक अंधश्रद्धा जोपासताना व प्रसार करताना दिसतात ही फार मोठी शोकांतिका आहे,शिक्षणातून शहाणपण येऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा परंतु फार जोमाने वाढणारी आधुनिक अंधश्रद्धा ही फ़ार चिंतेची बाब आहे. *अंधश्रद्धा,जातीयता* ही धार्मिक श्रद्धेवरच आधारित आहे तेव्हा ह्यांना मुळातूनच समाप्त करून वैज्ञानिक दृष्टिकोन सम्पूर्ण भारतीयमध्ये निर्माण करण्यासाठी कार्यक्षम होऊ या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुस त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून नतमस्तक होऊन महात्मा जोतिबा फुलेना स्मृती दिनी त्यांना विनम्र अभिवादन करू या……

कोटे आहे स्वर्ग |पाहिले ते कोणी|भिऊ नका मनी||
महात्मा जोतिबा फुलेना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.
प्राचार्य डॉ सत्यपाल कातकर
मनोवैज्ञानिक तथा लेखक,राजुरा
मो.क्र. 9822722765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *