व्यवसायअभ्यासक्रमाकरिता जात वैधता प्रमाणपत्रे आवश्यक – सूरेंद्र पवार सह आयुक्त जात परताळणी नागपूर ला भू वि कोंढाळी येथे जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण
Summary
कोंढाळी : प्रतिनिधी पदवी व व्यवसाय शिक्षण घेण्याकरिता प्रवेश व इतर शासकीय शिष्यवृत्ती,अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याचे जात परताळणी कार्यालय नागपूरचे सह आयुक्त सुरेंद्र पवार यांनी सांगितले. स्थानिक लाखोटीया भुतडा विद्यालय व […]

कोंढाळी : प्रतिनिधी
पदवी व व्यवसाय शिक्षण घेण्याकरिता प्रवेश व इतर शासकीय शिष्यवृत्ती,अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याचे जात परताळणी कार्यालय नागपूरचे सह आयुक्त सुरेंद्र पवार यांनी सांगितले.
स्थानिक लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारला ई-लर्निग हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य गणेश शेंबेकर, प्रमुख वक्ते सह आयुक्त सुरेंद्र पवार,महिला व बाल विकास कार्यालय काटोल संरक्षण अधिकार प्रवीण चव्हाण,जेष्ठ पर्यवेक्षक सुधीर बुटे, व्यवसाय समुपदेशक हरीश राठी, कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शिक्षक व वर्ग शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी 12 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.जातीचे प्रमाणपत्र मूळ वास्तव्याचे ठिकाणाहून काढावे.अशा सूचना यावेळी देण्यात आले.शासनाचे विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी तत्परतेने लाभ घ्यावा असे आवहन प्राचार्य गणेश शेंबेकर सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातुन केले. .संचलन रुपेश वादाफळे यांनी तर आभार सौ संध्या भुते यांनी मानले.
———–
विद्यार्थ्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा- प्रवीण चव्हाण संरक्षण अधिकारी
विद्यार्थ्यांनचे मातृपितृ छत्र हरपल्यास त्यांना शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नये याकरिता शासनाने बाल संगोपन विभागाचे वतीने आर्थिक (विद्या) अर्थसाह्य योजना राज्यात सुरू आहे. अशा लाभार्थ्यांनी निश्चित नमुन्यात अर्ज व संबंधित आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास शासन नियमानुसार लाभार्थी ठरू शकता असे महत्वपूर्ण मार्गदर्शन बाल संरक्षण अधिकारी प्रवीण चव्हाण यांनी केले. विधालयात शंभर लाभार्थी सभेला उपस्थित होते. संचलन दुर्गा भट्टड मॅडम यांनी केले. यावेळी जेष्ठ पर्यवेक्षक सुधीर बुटे, पोलीस विभाग समुपदेशक सौ ललिता येनुरकर, संगणक प्रशिक्षक संजय वाढवे आदी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांचे आवेदन पत्राची अधिकाऱ्यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.