वरिष्ठ स्तर दीवानी न्यायालयाच्या मागणी साठी काटोल तालुका वकील संघाचा न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्कार…
Summary
काटोल-प्रतिनीधी-(दुर्गा प्रसाद पांडे)22-नव्हेंबर मागील अनेक वर्षा पासून काटोल येथे वरिष्ठ स्तर दीवानी न्यायालय स्थापन करण्याची मागणी प्रलंबित असून महाराष्ट्र सरकार त्या कडे लक्ष देत नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी तालुका वकील संघाने दि २१/११/२२ पासून न्यायालयीन कामकाजावर पूर्ण बहिष्कार टाकण्या […]
काटोल-प्रतिनीधी-(दुर्गा प्रसाद पांडे)22-नव्हेंबर
मागील अनेक वर्षा पासून काटोल येथे वरिष्ठ स्तर दीवानी न्यायालय स्थापन करण्याची मागणी प्रलंबित असून महाराष्ट्र सरकार त्या कडे लक्ष देत नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी तालुका वकील संघाने दि २१/११/२२ पासून न्यायालयीन कामकाजावर पूर्ण बहिष्कार टाकण्या चा निर्णय घेतला आहे. वकील संघाच्या नुकत्याच झालेल्या तातडीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष दीपक केणे याणी स्पष्ट केले की, काटोल व नरखेड़ तालुका मिळून काटोल येथे वरिष्ठ स्तर दीवानी न्यायालय स्थापन करावे अशी आमची फार जुनी मागणी आहे. नरखेड़ वकील संघाने देखील यांस संमति दिलेली आहे. नागपुर जिल्ह्यातील महसूली उप-विभागात न्यायालय स्थापन करावे अशी शासनाची योजना आहे, त्यानुसार उमरेड, सावनेर, रामटेक येथे न्यायालय स्थापन करण्यात आली आहे फक्त काटोल ला वगळन्यात आले आहे हा काटोल व नरखेड़ च्या जनतेवर अन्याय आहे. न्यायालया साठी आवश्यक असणारे सर्व निकष पूर्ण करीत असूनही सरकार जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याने आम्ही बहिष्काराचे अस्त्र वापरित आहोत. जनतेने व पक्षकारानी आम्हास सहकार्य करावे अशी विनंती त्यानी केली आहे.