क्रांतीवीर बिरसा मुंडा एक तत्त्वज्ञानी नेतृत्व:-डाॅ.नामदेव खोब्रागडे यांचे प्रतिपादन
Summary
बहुजन असंघटीत कामगार आघाडी संघ यांच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची साई नगर येथील ‘रमाई’ सभागृह या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष:सि.बी.अंबादे जिल्हा अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली प्रमुखमार्गदर्शक डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष […]

बहुजन असंघटीत कामगार आघाडी संघ यांच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची साई नगर येथील ‘रमाई’ सभागृह या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:सि.बी.अंबादे जिल्हा अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली
प्रमुखमार्गदर्शक डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली
मा.साखरे जिल्हा कोषाध्यक्ष असंघटित कामगार आघाडी संघ गडचिरोली आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ नामदेव खोब्रागडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,”बिरसा मुंडा एक महान तत्त्वज्ञानी नेतृत्व व नेता म्हणून उदयास आले.बिरसा मुंडा यांनी धर्मातील अनिष्ट प्रथा व चालीरीती यांचा शोध घेऊन त्या अनिष्ट वाईट प्रवृत्तीवर जबरदस्त प्रहार केला.
बिरसा मुंडा यांनी हिंदू आणि ख्रिश्चन धर्म सोडून स्वतः बिरसा मुंडा यांनी आपल्या आदिवासी धर्माच्या मानवतावादी व समतावादी पवित्र विचाराचा त्यांनी प्रचार व प्रसार करायला सुरुवात केला.त्यांनी आपल्या धर्माचा सदाचार व सद्भावना पाया तयार केला.
आदिवासी धर्म प्रकृतिवाद,कर्मवाद, नैतिकतावाद
आणि सत्यवादी विचारांवर आधारित आहे.
बिरसा मुंडा यांनी लोकांना सांगितलेकी, आमच्या आदिवासी बांधवांनी लोकांसोबत प्रेमाने व बंधुभावाने वागावे, आणि धर्माच्या नावाखाली बलीप्रथा,हवन ,पुजन करु नये,दारु पियू नये, आणि धर्माच्या नावाखाली आदिवासी बांधवांनी वारेमाप आर्थिक खर्च करू नये अशा मानवी कल्याणाचा विचार आपल्या अनुयायांना उपदेश केला.
म्हणून माझ्या तमाम आदिवासी बांधवांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे प्रेरणादायी व मानवी कल्याणाचे विचार आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही.असे डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
माननीय जिल्हा अध्यक्ष चोकोबा अंबादे यांनी बिरसा मुंडा जयंती निमित्त विचार सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बन्सोड व आभार प्रदर्शन प्रमोद म्हाशाखेत्री यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.साखरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चीफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क