हेडलाइन

कार्तिक पूर्णिमा बौध्दांचा दानदिवस धम्मउत्सव

Summary

बौध्दांचा एकमेव पवित्र धम्मग्रंथ पालितिपिटक यातील मुळ इतिहास तथा बौध्द सभ्यतेच्या उज्ज्वल परंपरेनुसार तिमासिक वर्षावास समाप्तीच्या पर्वापासून अर्थात अश्विन पूर्णिमेच्या पवारणा उत्सवानंतर सर्व लोकांच्या हितासाठी, सुखासाठी परिपूर्ण, परिशुध्द अशी बुध्दाची संजीवनवर्धक धम्मशिक्षा घरपोच प्रदान करण्यासाठी प्रशिक्षीत भिक्खुसंघ धम्मचारिकेसाठी सज्ज होत […]

बौध्दांचा एकमेव पवित्र धम्मग्रंथ पालितिपिटक यातील मुळ इतिहास तथा बौध्द सभ्यतेच्या उज्ज्वल परंपरेनुसार तिमासिक वर्षावास समाप्तीच्या पर्वापासून अर्थात अश्विन पूर्णिमेच्या पवारणा उत्सवानंतर सर्व लोकांच्या हितासाठी, सुखासाठी परिपूर्ण, परिशुध्द अशी बुध्दाची संजीवनवर्धक धम्मशिक्षा घरपोच प्रदान करण्यासाठी प्रशिक्षीत भिक्खुसंघ धम्मचारिकेसाठी सज्ज होत असतो. असा धम्मसेवाभावी भिक्खु संघ परावलंबी असल्यामुळे तो उपासकांच्या दानावरच जगतो व लोकांमध्ये धम्म प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. लोकशिक्षणाच्या अर्थात समाज शिक्षणाच्या ‍भिक्खुंना आवश्यक वस्तुंच्या पूर्ततेकरीता दान करण्याची परंपरा प्रस्थापित झाली. म्हणून *कार्तिक महिना दानाचा महिना व कार्तिक पूर्णिमा ही दानाची पूर्णिमा* म्हणून बौध्द सभ्यतेत उदयास आली.
तथागत बुध्दवदीत दान, दानाचे प्रकार, दानाचे महत्त्व, दानाचे मानसिक लाभ तथा आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये दानाविषयी आस्था व अवस्था सुस्पष्ट करण्यासाठी दुर्गापूरच्या धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समितीच्या वतीने येणाऱ्या *कार्तिक पूर्णिमादिनी दिनांक 8 नोव्हेंबर 2022* रोजी दुर्गापूर येथे एक दिवसीय दानदिवस धम्मोत्सव आयोजित केला आहे. सदर धम्मउत्सवात रविवारीय धम्म अभ्यास वर्गाच्या प्रचारिकां द्वारा *1) बुध्द धम्मातील दान भावना-एक गुणात्मक विश्लेषन 2) दान भावना ही मानवी मनाचे उत्तम अलंकार 3) सब्ब दानं धम्म दानं जिनाति* . या प्रासंगीक विषयांवरील धम्मप्रबोधना सोबतच विद्यार्थ्यांद्वारा सांस्कृतीक काही उपक्रमसुध्दा “ *बौध्द सभ्यता रुजवन, संवर्धन व अभिवृध्दी अभियान* ” अंतर्गत दुर्गापूरच्या उपसिका सुहासिनी युवराज खोब्रागडे यांचे निमंत्तणावरून आयोजित केला आहे. यास्तव आयोजित दानदिवस समारंभात परिसरातील धम्मप्रीय बांधवांनी परिवारासह कार्तिक पूर्णिमेला

सायंकाळी 6.00 वाजता वार्ड क्र.1 दुर्गापूर येथील चंदु बाबाचे मठाजवळ उपस्थित राहून धम्मप्रबोधनाचा अवश्य लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *