महाराष्ट्र हेडलाइन

जिवती तहसील कार्यालय समोर मनसेचा पिक कर्जासाठी एक दिवशीय धरणा

Summary

तालुका प्रतिनिधी:-गोविंद गोरे मो:-8999878865 जिवती:- तालुक्यातील जवळपास 130 शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर झाला नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करती असल्याचे लक्षात घेऊन शेवटी मागणीच्या पूर्ततेसाठी 27 आक्टोंबर रोजी […]

तालुका प्रतिनिधी:-गोविंद गोरे
मो:-8999878865
जिवती:- तालुक्यातील जवळपास 130 शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर झाला नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करती असल्याचे लक्षात घेऊन शेवटी मागणीच्या पूर्ततेसाठी 27 आक्टोंबर रोजी जिवती तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणा आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर 27 आक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आंदोलनाचा धसका घेत संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत तहसीलदार प्रविण चिडे, जिवती सीडीसी बँकेचे व्यवस्थापक राठोड, जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप, मनसे जिल्हाध्यक्ष मंदिप, शेतकर संघटना तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जहागीरदार, मनसे तालुकाध्यक्ष हकानी शेख, सिद्धेश्वर सलगर, महिला अध्यक्ष मटपती , विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नागेश खांडेकर, दत्ता गायकवाड व इतर कार्यकर्त्या समोर चर्चा पार पडली. पिककर्ज मुदतवाढसाठी वरीष्ठांकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात येईल आणि मुदतवाढ मिळाली तर त्वरीत अर्जदार शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करण्यात येईल’ असे आश्वासन मिळाल्याने सदर धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले. आंदोलनात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधवांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *