भंडारा जिल्हा साऊंड लाईट असोसिशन तर्फे 5 नोव्हेंबर ला धरणे आंदोलन
जिल्हा भंडारा वार्ता:- कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते.पण आता हळू हळू सगळे व्यवसाय सुरू झाले आहेत. पण अजूनही भंडारा जिल्हा साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन, धुमाल, कटरिंग, डिजे, असोसिशन इव्हेंट मॅनेजमेंट, एलईडी वाल साऊंड लाईट, छाया चित्रकार अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले नाहीत.
आनंद घडवून आणनाऱ्यांच्या घरीच आज नैराश्य पसरले आहे, सगळे व्यवसाय सुरू झालेत.
मग फक्त आमच्याच व्यवसायावर मर्यादा का? हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अशा प्रकार च्या सर्व व्यावसायिकांनी एकत्रित येऊन दि.५/११/२०२० रोज गुरुवार ला दसरा मैदान भंडारा येथे सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
शुभांगी विष्णु बोरघरे
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर