स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी
नागपूर कन्हान शहर विकास मंच चे नागपुर महानगर पालिका अति. आयुक्त संजय निपाने ना निवेदन.
नागपूर(कन्हान) : – संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च महिन्यात टाळेबंदी व संचारबंदी मुळे नागपुर शहारातील स्टार बसेस मागील सहा महिन्यापासुन बंद आहेत. लॉक डाऊन मध्ये शिथिल करून हळुहळु सर्व कामधंदे सुरू करण्यात येत असल्याने प्रवाश्याना होणारा त्रास व स्टार बसेस चालक व वाहक यांचेवर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने यास्तव कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने यानी नागपुर महानगर पालिका चे महापौर संदीप जोशी, अति. आयुक्त संजय निपाने आणि बालाजी बोरकर साहेब हयाची भेट घेऊन याविषयी चर्चा करून कन्हान शहर परिसरातील बहुतेक लोक रोजी रोटी कमविण्या करिता नागपुर, हिंगणा, बुटीबोरी स्टार बसेस नी ये-जा करित असतात तसेच येथील युवक स्टार बस मध्ये चालक व वाहक म्हणुन काम करतात नागरिकांचा उदर्निवाहाचा प्रश्न मार्गी लागावा. यास्तव
कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रवीण गोडे, उपा ध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, हरीओम प्रकाश नारायण, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, ओम कुंभलकर आदीनी निवेदन देऊन त्वरित स्टार बस सुरु करण्याची मांगणी केली.
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी
९५०३३०९६७६