गडचिरोली जिल्हा ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मुनघाटे
Summary
जिल्हा गडचिरोली वार्ता:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी गडचिरोली जिल्हा ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल धनंजय मुनघाटे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर यांनी नुकताच पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन […]
जिल्हा गडचिरोली वार्ता:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी गडचिरोली जिल्हा ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल धनंजय मुनघाटे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर यांनी नुकताच पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन राहुल मुनघाटे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर , उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर,संघटक सुरेश भांडेकर मार्गदर्शक दादाजी चापले,गोविंदराव बानबले,पांडुरंग नागपुरे, सौरभ निंबेकार, अमोल कांबळे, रितेश धाईत,आदी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी गडचिरोली जिल्ह्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवर ओबीसी युवकांची फळी निर्माण करून , जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या संघटन बांधणीवर जोर देणार असल्याचे सांगितले.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर