BREAKING NEWS:
महाराष्ट्र

शाळा सुरू होई पर्यंत विद्यार्थ्याची फी कमी न केल्यास शाळेची चौकशी लावणार – रश्मी बर्वे.

Summary

बी के सी पी शाळा व संस्थेने दुस-या बैठकीतही फी भरण्याचा तगादा. शाळा व संस्थेने पालकांच्या प्रश्नाचे समाधान न करता वेळ मागुन वेळ मारून नेली. नागपूर (कन्हान ):- बीकेसीपी शाळा प्रशासन, संस्थेचे प्रतिनि धी हयानी जि प नागपुर येथे झालेल्या […]

बी के सी पी शाळा व संस्थेने दुस-या बैठकीतही फी भरण्याचा तगादा.

शाळा व संस्थेने पालकांच्या प्रश्नाचे समाधान न करता वेळ मागुन वेळ मारून नेली.

नागपूर (कन्हान ):- बीकेसीपी शाळा प्रशासन, संस्थेचे प्रतिनि धी हयानी जि प नागपुर येथे झालेल्या बैठयकीत ऑन लाईन शिक्षण व फी कमी करण्याच्या पालकांच्या समस्या निवारणा करिता दहा दिवसाची वेळ मागितल्याने जि प अध्यक्षा रश्मी बर्वे व अधिका-यानी शाळा व संस्थेला वेळ देऊन दहा दिवसात शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्याचे फी कमी करून पालकांचे समाधान न केल्यास शाळेची चौकशी लावणार असे बजाविले.
बीकेसीपी शाळा कन्हान येथे नर्सरी, केजी १ ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत असुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात टाळेबंदी व संचारबंदीमुळे मार्च २०२० पासुन शाळा बंद असताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन आपात्काळ परिस्थिती शाळेने विद्यार्थाना ऑनलाईन शिक्षण न देता पालकांना शाळेची फी भरण्यास तगादा लावुन अनेक समस्या निर्माण केल्याने जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी पालकांच्या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.२१) ला जिल्हा परिषद येथे अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणा धिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्राथमिक, माध्यमिक व पालकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका नाथ (माध्य), राव (प्राथ) यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अध्यक्षांनी चांगलेच सुनावले. पालकांच्या समाधानाकरिता संस्था चालकांची सोमवारी (दि २६) ला दुस-यादां जि प नागपुर येथे अध्यक्षा रश्मी बर्वे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे,,(माध्य) शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारी( प्रा) पारशिवनी गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, संस्थेचे प्रतिनिधी भाटिया, शर्मा, मुख्याध्यापिका नाथ मॅडम, राव मॅड म व पालक यांची बैठक झाली. यात पालकांनी ऑन लाईन शिक्षण व फी समस्याच्या प्रतिवेदन देऊन समस्याचे निराकरण करून फी कमी करण्याचा आग्रह केला. यात अ) बीकेसीपी शाळा प्रशासनाने ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय ते पहिले स्पष्टीकरण द्यावे. १) इयत्ता १० वी विद्यार्थ्यांच्या महत्त्वाचे वर्ष असुन शाळे ने आज पर्यंत ऑनलाइन लाईव्ह शिक्षण का नाही दि ले. २) विद्यार्थ्यांचा फक्त ब्रॉडकास्ट ग्रुप बनवुन त्यात मागील वर्षीच्या विद्यार्थ्याच्या नोटचे फोटो पाठवुन ते वहीत लिहिण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निराकरणास फोन केल्यास फोनवर विद्यार्थ्यांचे निरा करण का केले नाही. ३) महाराष्ट्र शासन शिक्षण विभा गाने २०२०-२१ सत्राकरिता २५% कमी केलेल्या अ भ्यासक्रम शाळेला माहीत नसल्याने संपुर्ण अभ्यासक्र मावर नोट शाळेने का पाठविले. ४) १० वी च्या विद्या र्थ्यांना पाठविलेल्या प्रश्न पत्रिका बोर्ड पॅटर्न नुसार का पाठविल्या नाही. ज्यामुळे अर्धे सत्र होऊन ही विद्या र्थ्यांना इंग्रजी विषयाचा पेपरचा पॅटर्न कसा राहतो हे सुद्धा माहीत नाही. ५) शाळेत १ ते ४ मराठी विषय सक्तीचा असुन शिकविला जात नाही. परंतु ५ वी च्या बढती विद्यार्थ्याचा मराठीचा पेपर का घेण्यात आला. ब) शाळेची फी भरण्यास केलेली सक्ती. १) शाळेने विद्यार्थ्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर वारंवार फी भरण्याचा मॅसेज पाठवुन तगादा का लावला ? २) पेपर विद्यार्थ्यां ना घरी सोडवुन पालकांना शाळेत जमा करण्यास बोलावुन उत्तरपत्रिका फी भरल्या शिवाय घेतल्या नाही. ३) पालकांना उदभवलेल्या प्रश्नाचे निराकरणाकरिता शाळेत लिपीक, सुरक्षारक्षका शिवाय कुणीही उपस्थि त नव्हते. ४) दरवर्षी५६० रु ऍक्टिव्हिटी फी ऑगस्ट व नोव्हेंबर या दोन महिन्यात ११२० रू घेतल्या जाते. ती यावर्षी टर्मफी च्या नावाने का घेत आहे. ५) पुर्ण फी भरल्या शिवाय विद्यार्थ्याना वरच्या वर्गात बढती नाही. क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन – १) शासनाच्या निर्देशानुसार सीबीएसई व स्टेट बो र्डच्या सर्व शाळा इयत्ता १ ते ८ वी करिता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमाप न पद्धत (आकारिक व संकलित मूल्यमापन) वापरत आहे. पण या शाळेत अजुन पर्यंत ही पध्दत का वापर त नाही. कदाचित शासनाचे नियम बंधनकारक नाही का ? २) ही शाळा अजुनही जुन्या पद्धतीनेच विद्या र्थ्यांचा निकाल तयार करून विद्यार्थ्यां मध्ये स्पर्धा नि र्माण करित आहे. ड) शिक्षणाधिकारी मार्फत शाळेती ल शिक्षकवर्ग मान्यता प्राप्त आहे का ?
१) शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचायांना संस्थेने पुर्ण वेतन दिले का ?
२) नर्सरी ते १० पर्यंत प्रत्येक पालकांचे २ ते १० हजा र रू पर्यंत जमा ठेवी शाळेत कश्याकरिता आहे.
३) फी भरण्याच्या कक्षा जवळ पालकांची गर्दी होऊ नये म्हणुन काहीही व्यवस्था न करून गर्दी झाल्याने शाळे ने नियमाचे का उलघंन केले. इ) शाळा जर अल्पसं ख्याकांची आहे तर शाळेत अल्पसंख्याकं विद्यार्थी किती आहे. त्याना कोणत्या व किती सोयी सुविधा दिल्या जातात. आदी विषयाचे समाधान व शाळेतील खर्चाचे नियोजन करून फी कमी करण्याकरिता संस्थे च्या प्रतिनिधीनी १० दिवस मांगितले. शाळेच्या मुख्या ध्यापिका व संस्था प्रतिनिधीचा उलटसुलट उत्तराने वेळ काढुपणा आणि पालकांचा संताप लक्षात घेत जि प अध्यक्षा बर्वे व अधिकायांनी दहा दिवसात कोविड – १९ काळ व शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्याचे फी कमी करून पालकांचे समाधान न केल्यास शाळेची चौकशी लावणार असे बजावित पालकांचे समस्याचे निराकरणास शिक्षण शुल्क (फी) कमी करण्यात येईल असे आस्वस्त केले. यावेळी प्रशांत वाघमारे, मोतीराम रहाटे, अशोक खंडाईत, आस्तिक चिंचुलकर, किशोर वासाडे, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, दिनेश नानवटकर, गजानन गजभिये, सुरेश खेरगडे, दिनेश ढोके, विजय पारधी, राजेश फुलझेले, कमरे आलम, संजय चोपकर, आंनद पाटील, अविनाश कांबळे, मोहसीन खान, सिंग, बुटेलिया, अरूण पोटभरे सह १० वी चे जास्त पालक उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *