उल्हासनगरमध्ये आता फसवणुकीचा नविनच प्रकार समोर आलाय.
काल संध्याकाळी साधारणपणे 7 च्या दरम्यान एक पायी चाललेल्या तरुणीला (वय 21 वर्ष) एका 48 ते 50 वयाच्या गृहस्थाने त्याची दुचाकी स्कुटी तिच्या जवळ उभी करून तिला तिच्या नावाने आवाज दिला.तिला थांबवुन तिच्याशी बोलू लागला.त्याने तिला विचारले तू मला नाही ओळखले का? त्याने तिच्या सर्व कुटुंबातील मंडळींची तसेच सर्व नातेवाईक यांची इतकी बरोबर व अचुक माहिती दिली की त्यातील बरीचशी माहिती तिला स्वतःला देखील नव्हती. तिला आता 100% खात्री पटली की हा व्यक्ती माझा जवळचा कुणीतरी आहे.तसेच तो वयस्कर असल्याने मनात इतर कुठली शँका देखील आली नाही.त्यांनतर त्याने ती कुठे job ला आहे किती पगार आहे ते सांगितले.तुला यापेक्षा चांगला job देतो व चारपट पगार. माझ्या मित्राच्या ऑफिस मध्ये लगेच . अस बोलुन तु फक्त 10 मिनिटांसाठी सोबत चल इथे जवळच ऑफिस आहे म्हणाला.
आता ती लहान मुलगी त्यात वयस्कर व्यक्ती आपला नातेवाईक आपली इतकी काळजी करतोय म्हणून तिनेही क्षणाचा विचार न करता तयार झाली. तिला वाटले 10 मिनिटे तर आहे.ती त्याच्या गाडीवर लालचक्की सुनीता जगताप डॉक्टर यांचे हॉस्पिटल येथून बसली त्याने त्याची दुचाकी अंबरनाथ च्या दिशेने वळवली.तो तिला गप्पामद्धे रमवत गाडी पळवत होता. इतक्यात गुरुकुल हायस्कुल इथे पोहोचताच मुलीला आईचा फोन आला.तिने आईला फोनवर सर्व सांगायला चालू केले. *आई शेवटीं आई इतके पावसाळे पाहिले तिने तत्काळ मुलीला आहे तिकडे गाडी थांबव म्हणाली* . मी व भाऊ आम्ही येतो मग आपण सोबत जाऊ म्हणाली.मुलीने त्या गृहस्थाला म्हणाली काका गाडी थांबवा.मुलगी आरडाओरडा करेल म्हणून त्याने तिकडे गाडी थांबवली.मुलगी म्हणाली काका 5 मिनिटे थांबा आई व भाऊ येतो आहे.काका म्हणाला ठीक त्यांना येऊ दे माझ्या मित्राने ऑफिस इथेच आहे मी गाडी पार्क करून येतो.
त्या भामट्याने जी गाडी पळवली तो क्षणात दिसेनासा झाला. त्या मुलीचे आई व भाऊ काही मिनिटात आले. मुलीला तिला फसवले गेले याचे जाणीव झाली.ती रडायला लागली.आईने तिला कवटाळून जवळ घेतले व समजावले.भावाने शोध घेतला परंतू तो भामटा फरार झाला होता. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.पोलिसांनी सांगितले आमच्या कडे 7 दिवसात ही 3 री केस आली आहे.आणि ज्या मुली या जाळ्यात खरोखर फसल्या असतील त्यांचे काय? विचार करूनच धस्स होतय
मित्रांनो, पालकांनो, माझ्या माता भगिनींनो किती भयाणक प्रकार घडत आहेत.खरोखर पालकांनी आपल्या मुलांना व मुलींना सांगा कुणी कितीही जवळचा व्यक्ती असेल तर त्याच्या सोबत कुठेच जाऊ नका.पैशाचे नोकरीचे आमिष देऊन आपल्या मुलींची व मुलांची फसवणूक होऊ शकते.लहान वयात मुलांना समजत नाही त्यांना पालकांची सतर्क व सावधान करा.
जनहितार्थ🙏🙏🙏
🌼 माही 🌼
टीप : ही घटना कालच माझ्या मित्राच्या बहिणीसोबत (अर्थात माझीही बहिणच) घडली आहे.तसेच सदर मुलगी कोण आहे असा मुर्खपणाचा प्रश्न विचारू नका.