15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्राम पंचायत दुर्गापूरच्या हद्दीतील पानी पुरवठा वाढीव पाईपलाईन च्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करा.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन उप तालुखा प्रमुख शिवसेना तथा सचिव कंत्राटी कामगार सेना, शार्दूल गणवीर यांची मागनी.
15 वा वित्त आयोग सण 2020-21 मौजा दुर्गापूर येथील वाढीव पाइप लाईन च्या कामात पदाचा दुरुपयोग करून आर्थिक अफरातफर व संगनमताने गैरव्यवहार केल्याप्रकरणी ग्राम पंचायत दुर्गापूरच्या सरपंच सौ.पूजा पवन मानकर, ग्राम विकास अधिकारी श्री अशोक जेंगठे व कंत्राटदार गुरदीप सिंह धुंन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करून जनहिताची रक्कम वसूल करण्याबाबत ची मागणी निवेदन सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद चंद्रपूर यांना,शार्दूल गणवीर यांच्या द्वारे करण्यात आली.सदर कामात पाइप खरेदी करणे, व्हॉल्व बसविणे,खोदकाम करणे,पाईपलाईन पसरविणे इत्यादि कामात घोटाळा करून निधीची गैरवापर केल्याचे आरोप करण्यात आले.