ग्रामसभा संपण्यापूर्वीच सरपंच नी ग्रामसभेतून केले पलायन

1सप्टेंबर 2022 ला तहकूब ग्रामसभा दुपारी 12:00 वाजता चिरोली येथील कन्नमवार सभागृहामध्ये प्रभू गंधेवार यांचे अध्यक्षतेखालील घेण्यात आली त्यात कार्यक्रम पत्रिकेवरील विषया मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती व अध्यक्ष च्या अनुमतीने वेळेवर येणारे विषय या विषयावर तहकूब ग्राम सभा सुरू झाली त्यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष म्हणून प्रशांत रामटेके यांची निवड करण्यात आली तंटा मुक्त समिती च्या पद निहाय निवडणूक का कार्यक्रम का आखण्यात आला नाही याचा जाब जनतेनी विचारताच ग्राम विकास अधिकारी यांचे कडून समाधान कारक उत्तर ग्राम विकास अधिकारी यांना देता आले नाही या संधी चा फायदा घेत अध्यक्ष्यानी सभा संपल्याचे घोषित करण्याआधीच सरपंच मीनल लेनगुरे यांनी ग्राम सभेतून काढता पाय घेतला