भारतीय नौदललाचा नवा ध्वज
Summary
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत देशाच्या सेवेसाठी समर्पित केली. तसेच नौदलाच्या नव्या चिन्हाचेही अनावरण केले. यावेळी नवीन नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. नवीन ध्वजाचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान […]

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत देशाच्या सेवेसाठी समर्पित केली. तसेच नौदलाच्या नव्या चिन्हाचेही अनावरण केले. यावेळी नवीन नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
नवीन ध्वजाचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, आज भारताने आपल्या छातीतून गुलामगिरीचे ओझे काढून घेतले. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे.
आयएनएस विक्रांतच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, हे युद्धनौकेपेक्षा तरंगते हवाई क्षेत्र आहे. त्यातून निर्माण होणारी वीज ५ हजार घरांना प्रकाश देऊ शकते. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व तारा कोचीन ते काशीपर्यंत पोहोचू शकतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असं नौदल उभारलं, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापार यांचा धाक होता. त्यामुळे त्यांनी भारताच्या सागरी सामर्थ्याचे कंबरडे मोडायचे ठरवले. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्यांवर किती कडक निर्बंध लादले गेले, याचा इतिहास साक्षीदार असल्यांच मोदींनी सांगितलं.
जेव्हा विक्रांत आपल्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही तिथे तैनात असतील. महासागराची अफाट शक्ती, अफाट स्त्री शक्ती, ही नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. आता भारतीय नौदलाने महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते ते