BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सत्य शोधक संघा तर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा

Summary

नागपूर (कन्हान ): – एखादा मनुष्य जेव्हा स्वत:च्या अकुशल स्वभावावर कार्य करण्यास सुरुवात करतो त्याचक्षणी धम्माचा उगम होतो. जेव्हा तो इतरांबद्दल संवेदनशील बनून करुणापूर्ण अंतकरणाने त्यांचा आदर करतो व स्वत:च्या आचरणातून इतरांसाठी कुशल परिस्थिती निर्माण करतो त्यावेळी धम्मभूमी निर्माण होते. […]

नागपूर (कन्हान ): – एखादा मनुष्य जेव्हा स्वत:च्या अकुशल स्वभावावर कार्य करण्यास सुरुवात करतो त्याचक्षणी धम्माचा उगम होतो. जेव्हा तो इतरांबद्दल संवेदनशील बनून करुणापूर्ण अंतकरणाने त्यांचा आदर करतो व स्वत:च्या आचरणातून इतरांसाठी कुशल परिस्थिती निर्माण करतो त्यावेळी धम्मभूमी निर्माण होते. त्या धम्मभूमीतून जेव्हा प्रबुद्ध माणसे निर्माण होतात तेव्हा धम्मचक्र गतिमान होतो. बाबा साहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण करण्याकरिता ६४ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्य सत्य शोधक संघ कन्हान व्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तथागत गौतम बुध्द, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जेष्ट विनायकजी वाघधरे, कैलास बोरकर, रमेश गोडघाटे, प्रशांत वाघमारे, योगेंद्र रंगारी, मधुकर गणवीर, मनिष भिवगडे आदीच्या हस्ते माल्यार्पण, मानवंदना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी मान्य वरानी बौद्ध धम्म हा कोणत्याही जातीच्या, धर्माच्या आणि कर्मकांडाच्या विळख्यात अडकलेला धम्म नाही सर्वश्रुत सर्वश्रेष्ठ आणि जगाने स्वीकारलेला, शांती प्रस्थापित करणारा, नैतिक कर्तव्य म्हणजेच पंचशीला वर आधारित आयुष्य कल्याणकारक घडविणारा धम्म आहे. राजा सम्राट अशोक यांनी याच दिवशी बौद्ध धम्म स्विकारला आणि बुद्धाला शरण गेले. असे मार्ग दर्शन केले.
तथागत गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून उपस्थि ताना धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या आणि अशोका विज यादशमी दिनाच्या सत्य शोधक संघ कन्हान व्दारे सर्वाना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचालन निशांत मोटघरे यानी तर आभार
सतीश भसारकर यानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शैलेंद्र माटे, निखिल रामटेके, अशोक नारनवरे, विक्की उके, स्वप्निल वाघधरे, नरेश चिमनकर, गौतम नितनवरे, सागर उके, मयूर माटे, अभिजीत चांदूरकर, प्रिंतेश पौणिकर, प्रमोद चंद्रिकापुरे, सुमित घोरपडे, अतुल ढोके, शैलेश दिवे, दिनेश नारनवरे, राजा चांहादे, नितीन मेश्राम सह सत्य शोधक संघ कन्हान च्या कार्यकर्त्यानी सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *