सोयाबीन खोडकिडा तर! संत्रा मोसंबीच्या बागायतीवर फळगळ
Summary
सोयाबीन खोडकिडा तर!संत्रा मोसंबीच्या बागायतीवर फळगळ काय करावे कसे जगावे बळीराजाने बळीराजा ठरतोय निसर्गाचा बळी कोंढाळी -वार्ताहर काटोल तालुक्यातील सोयाबीन व संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकरी नैसर्गिक बळी ठरत आहे . काटोल तालुक्यातील सोयाबीन उत्पादक सोयाबीन पीकावर खोडकिड्याच्या तडाख्यात सापडला असुन संत्रा […]

सोयाबीन खोडकिडा तर!संत्रा मोसंबीच्या बागायतीवर फळगळ
काय करावे कसे जगावे बळीराजाने
बळीराजा ठरतोय निसर्गाचा बळी
कोंढाळी -वार्ताहर
काटोल तालुक्यातील सोयाबीन व संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकरी नैसर्गिक बळी ठरत आहे .
काटोल तालुक्यातील सोयाबीन उत्पादक सोयाबीन पीकावर खोडकिड्याच्या तडाख्यात सापडला असुन संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकर्याना फळगळी चा जबर फटका बसत असल्याची माहिती काटोल तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके व त्यांचे कृषी मंडळ व कृषी सहायकां सोबतचे डाॅ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतरगत प्रादेशीक फळसंशोधन केंद्र वंडली- काटोल चे कीटकशास्त्रज्ञ डाॅ प्रदिप दवने व त्यंचे सहकार्यांनी काटोल तालुक्यातील कोंढाळी,शिरमी, सोनेगाव, खैरी,बोरगाव ,तरोडा, मासोद, धुरखेडा,सह अनेक गांवांचे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे शेतीवर जाऊन प्रत्यक्षात पाहणी दरम्यान शिरमी येथील शेतकरी संजय नथ्थुजी राऊत यांचे शेतावर सोयाबीन पीकावर विशिष्ठ प्रजातीचे खोडकिड्याच्या प्रदुर्भाव झाल्याचे दिसुन आले.
सध्या हा प्रदुर्भाव प्राथमीक स्वरूपात (20ते25टक्के)असल्याचे कृषी अधिकारी व कीटकशास्त्रज्ञांनी सांगितले व या वर फवारणी करीता लागणारे किटकनाश औषधीच्या फवारणी ची माहीती ही दिली.
त्याच प्रमाणे संत्रा-मोसंबीच्या बागांमधे मोठ्याप्रमाणात फळगळी च्या तक्रारी च्या पाहणी करीता मेंडकी,दिग्रस, खुटांबा, गोंडी मोहगाव भागातील बागायीतींची पाहणी केली असता मोठ्याप्रमाणात होणारी फळगळी ला नियंत्रित ठेवण्या करीता डाॅ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतरगत येणारे कीटकशास्त्रज्ञ डाॅ प्रदिप दवने व सहयोगी अधिकारी यांनी शेतकर्यांना शस्त्रीय पद्धतीने औषध फवारणी व झाडांना द्यावयाचे प्रमाण व बागायीतींमधे साचलेल्या पाण्याचा निचरा कसा करावा या बाबद घरतवाडा येथील महीला शेतकरी विमलताई बाविस्कर यांचे मोसंबी बागायीतीं मधे झालेल्या फळगळी ची पाहणी केली व उपस्थिती शेतकर्यांना फळगळी चे नियंत्रणा बाबद माहीती दिली.