प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान धम्म प्रचार – प्रसार कार्यशाळा दिनांक 23 व 24 जुलै 2022
प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान धम्म प्रचार – प्रसार कार्यशाळा दिनांक 23 व 24 जुलै 2022
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह , आंबेडकरनगर , नासिक-पूना हायवे , नासिक .
प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान सन 2003 पासून आयु. श्याम तागडे (IAS) यांच्या नेतृत्वाखाली धम्म प्रत्यक्ष आचरणात यावा व बौद्ध संस्कृती निर्माण व्हावी यासाठी सतत कार्य करीत आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये धम्म कार्यशाळा व बौद्ध संस्कृती निर्मिती कार्यशाळा प्रतिष्ठान मार्फत आयोजित केलेल्या आहेत. संपूर्ण देशात व राज्यात धम्मकार्य हे एकाच दिशेने व्हावे यासाठी प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान प्रयत्नरत आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील धम्मकार्याची आखणी करणे, धम्मप्रचारक निर्माण करणे व एकाच दिशेने राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये धम्मकार्याचे नियोजन करणे व भिक्खु, भिक्खुणी, उपासक व उपासिका संघ बळकट करून बुद्ध शासन अधिक प्रभावशाली करणे याबाबत चर्चा करून धम्मकार्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी दिनांक 23 व 24 जुलै, 2022 रोजी नासिक येथे दोन दिवसीय निवासी धम्म कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहावे, अशी आपणांस विनंती आहे.
डॉ. माया ब्राम्हणे राजरतन कुंभारे अध्यक्ष सचिव
9422468746 9482114165
आपले विनित
डॉ. जी एल वाघ-9130671714
आयु . चंद्रकांत गायकवाड सर-9420698544
आयु . राजेंद्र भालशंकर सर -9823678620
कार्यक्रम वेळापत्रक
शनिवार, दि. २३ जुलै २०२२
स . ९ .०० ते १०.३० : – नोंदणी , चहा , नास्ता .
स .१०.३० ते ११ .०० : पंचशिल ग्रहण व प्रास्ताविक
स .११ . ०० ते १२ . ००: – बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बुद्ध धम्म मिशन . दु .१२ . ०० ते १ . ३० : – बुद्ध, धम्म, संघ यावर मार्गदर्शन .
दु . १.३० ते २.३० : – भोजन दु . २.३० ते ४.०० : – चार आर्यसत्य , अष्टांगिक मार्ग .
दु . ४.०० ते ४ .१५ : – चहा
दु . ४.१५ ते ६ .३० : – बुद्ध व त्यांचा धम्म ग्रंथातील प्रस्तावनेमधील चार प्रश्नांवर मार्गदर्शन
सायं ६.३० ते ८.०० : – सद्यस्थितीस धम्म प्रचार -प्रसार व धम्म आचरणास बाधा आणणाऱ्या गतीविधींवर मार्गदर्शन . ( व्हिडीओ )
रा . ८ .०० :- भोजन व विश्रांति
रविवार, दि. २४ जुलै २०२२
स . ८ .०० ते ९ .०० : – चहा नास्ता .
स .९ .०० ते ९.३० : – त्रिसरण व पंचशिल ग्रहण
स . ९.३० ते १०.३० : धम्मप्रचारक निर्माण करणे व त्यांची कार्यपध्दती .
स .१०.३० ते १० .५० :- विश्रांती
स .१० .५० ते १.०० : – धम्मप्रचाराची दिशा ठरवणे
दु . १ .०० ते २ .०० : – भोजन व विश्रांती
दु . २ .०० ते २ . ३० : – बोधीसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर धम्म अकादमी , जंबुद्विप विहार व भिक्खु प्रशिक्षण केंद्र , बुद्धघोष पाली प्रशिक्षण व शैक्षणीक संस्था ,
रमाई सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उत्थान केंद्र याविषयी माहिती
दु . २ . ३० ते ३. ३० :- बुद्ध शासनात दानाचे महत्व
दु . ३.३० ते ५.०० : – मनोगत व समारोप
सायं ५.०० :- नास्ता , चहा