कोंढाळी बस स्थानकावर वाहनतळ डांबरीकरणाकरीता कत्रांटदारच मिळे ना!
Summary
कोंढाळी बस स्थानकावर वाहनतळ डांबरीकरणाकरीता कत्रांटदारच मिळे ना! वाहनतळ मजबूती कत्रांटदार च मिळे ना! कोंढाळी-वार्ताहर कोंढाळी बस स्टेशन नागपुर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यी प्रवाश्यांनी गजबलेले कोंढाळी बस स्थानकवरील वाहन तळाचे डांबरीकरण करून देण्याकरीता कत्रांटदरच धजवत नाहीत . या […]
कोंढाळी बस स्थानकावर वाहनतळ डांबरीकरणाकरीता कत्रांटदारच मिळे ना!
वाहनतळ मजबूती कत्रांटदार च मिळे ना!
कोंढाळी-वार्ताहर
कोंढाळी बस स्टेशन
नागपुर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यी प्रवाश्यांनी गजबलेले कोंढाळी बस स्थानकवरील वाहन तळाचे डांबरीकरण करून देण्याकरीता कत्रांटदरच धजवत नाहीत . या कारणामुळे येथील बस स्थानकाचे वाहन तळाला अल्पश्या पावसातही पावसाचे पाणायाचे जागो जागी डबके साचत असते तर जोराच्या पावसात या परिसराला तलावाचे स्वरूप येत असते.
कोंढाळी बसस्थानकाचे नुतनीकरण करण्या साठी माजी गृहमंत्री व या भागाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख यांनी 56लाख रूपयांचा विकास निधी मंजूर करून नवीन बसस्थानकाचे काम झाले, मात्र येथील वाहन तळाचे मजबूती करीता जि प सदस्य सलील देशमुख यांनी एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक ते व्यवस्थापकीय संचालक (डी सी टू एम डी) यांना भेटून येथील मुलभुत व पायभूत सोयी पुर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात भेटून निवेदने दिली व चर्चा ही केली. यातून कोंढाळी बसस्थानकाचे वाहन तळाचे कामा करीता एस टी महामंडळाकडून एकदा नाही तर तिन तिन दा निविदा (टेंडर)काढण्यात आली. मात्र कोंढाळी बसस्थानकाचे वाहनतळ डांबरीकरण निविदा व वाहनतळावरिल बांधकाम याचा ताळमेळ बसत नसल्याने कोणताही कत्रांटदाराकडून मागील सहा सात महिण्यात निवादा भरल्या नाही या करीता वाहनतळाचे काम रखडले आहे.
*फटका-विद्यार्थ्यी व प्रवाशांना*
येथील बसस्थानकावरून दररोज250ते260 प्रवाशी बस गाड्यांच्या माध्यमातून प्रवशी व शाळेकरी विद्यार्थ्यांची उचल केल्या जाते. येथील बसस्थानका च्या वाहनतळावरील भू पृष्ठाची प्राथमीक मजबूती न झाल्याने गिट्टी पुर्ण पणे उखडून जागोजागी खडे पडले आहे. उन्हाळ्यात व हिवाळ्यात उडलेली गिट्टी बस च्या टायर ने उडून त्याचा मार प्रवांशांना बसत असतो, तर पावसाळ्यात येथोल वाहनतळावरिल साचलेले चिखलयुक्त पाणी अनेकदा प्रवाशांवर उडत असतो, यातून अनेकदा प्रवाशी व बस चालकांमधे वादावादी चे अनेक प्रसंग उद्भवले आहेत.
या करीता आता तरी एस टी महामंडळ प्रशासनाने पुढाकरा घेउन कोंढाळी येथील बस स्थानकावर वाहनतळावरिल डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण, व्हेदर शेड बनविने, दोन सफाई कामकार तर तिन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यासारखे महत्त्वाचे कामें पुर्ण करवून द्यावी अशी मागणी ग्रा प सरपंच केशवराव धूर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास, ग्रा प सदस्य संजय राऊत कमलेश गुप्ता , रा का प्रतिनिधी नीतीन ठवळे, आकाश गजबे प्रशांत खंते, माजी सरपंच नरेश राऊत, नरेश सिंह सेंगर, सदाफ पठाण, अफसर हुसेन, रजा पठाण, मनोज तिवारी, दिनेश तांबूलकर, रोहीत गोलाईत, शेख नूरमहंम शेख इस्राईल, यांचे सह ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या जनप्रतिनीधी यांचे माध्यमातून एस टी महामंडळ प्रशासना कडे केली आहे.