हेडलाइन

वसंतराव नाईक यांचे शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान ग्रा प कोंढाळी चे वतीने कृषी दिन साजरा  वसंतराव नाईक यांची जयंती;

Summary

वसंतराव नाईक यांचे शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान ग्रा प कोंढाळी चे वतीने कृषी दिन साजरा वसंतराव नाईक यांची जयंती;     कोंढाळी-वार्ताहर महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या […]

वसंतराव नाईक यांचे शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान

ग्रा प कोंढाळी चे वतीने कृषी दिन साजरा

वसंतराव नाईक यांची जयंती;

 

 

कोंढाळी-वार्ताहर

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. या दिवसा निमित्त

ग्रा प कोंढाळी चे वतीने 01जुलै रोजी सकाळी 11-00वाजता ग्रा प चे सभागृहात हरित क्रांति चे जनक व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची सरपंच केशवराव धुर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत वसंत राव नाईक यांची जयंती व कृषी दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी सांगितले की दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 01 जुलै ते 07 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा केला जातो.

भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. अशी माहीती ग्रा प सदस्य संजय राऊत यांनी दिली.

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे. त्यांना राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं.  अशी माहीती या भागातील कृषी सहायक जगन्नाथ जायभाये यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *