प्रहार समोर एस.आर.कंपनी झुकली .. १५ दिवसात सर्व मागण्या पूर्ण करणार ..
जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- वरोरा चिमूर नॅशनल हायवे रोड चे काम सदर एस.आर.के कंत्रक्षण कंपनी कडे सोपविले असून यांच्या हलगर्जी तसेच यांच्या निष्काळजी पणा मूळे गेल्या काही वर्षा पासून या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून असलेल्या अर्धवट कामा मूळे स्थानिक तसेच दररोज ये जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे या अर्धवट तसेच कच्या रस्त्यामुळे या मार्गावर अनेक प्रकारचे अपघात होत असून या मार्गावर अनेकांना अपंगत्व तसेच मृत्यू झाल्याची अनेक घटना होत असल्याने तरी याची दखल समधीत विभाग तसेच कांत्रक्ष्यन कंपनी वारंवार दुर्लक्ष करून येथील तसेच परिसरातील जनतेच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसा पासून सुरु होता.
या गंभीर समस्यांची चिळ म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शाख वरोरा चे कार्यकर्ते श्री अक्षय बोंद गुलवार , यांच्या नेतृत्वाखाली. वरोरा चिमूर भेंडळ येथील एस आर के कंपनी क्यापं समोर आज सोमवरला मुजोर कंपनी विरोधात भव्य ठिय्या आंदोलन तसेच रक्तदान करून कंपनी चा विरोध करून कंपनी चे लक्ष्य वेधून सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या तर हे आंदोलन रात्रौ ७. वाजे पर्यंत चालले .
तर या मध्ये रस्त्याचे काम तात्काळ व जलद गतीने करा . स्थानिक कामगार लोकांना कामावर घ्या. व स्थानिक युवकांना प्राधान्य द्या . वेल्डारस लोकांचे संपूर्ण बिल लवकर द्या . कंपनीच्या चुकीच्या धोरण मुळे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या व अपंगत्व आलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्या. रोड वर असलेल्या शेतकऱ्यांचे पीक धुळमुळे नष्ट होत असल्याने त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई द्या . कंपनी च्या वाहणाकडे कोणतेही कागत पत्रे नसून या वाहनावर रोड कर , इन्शुरन्स विमा नसून अश्या वाहनावर जप्ती करण्यात यावे …स्थानिक मोखळा – साखरा येथील गिठ्ठी ख दा न मूळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्यात यावी . कंपनीच्या कामाला पाणी पुरवठा करणाऱ्या नागरिकांचे बिल तात्काळ मंजूर करावे .. कंपनी च्या वाहनाने मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना तात्काळ २५ लाख रुपये रोख द्यावे व अपंग झालेल्या इसमाला १० लाख रुपये देण्यात यावे कामगारांना शासकीय नियमानुसार वेतन देऊन फक्त ८ तास काम करून घ्यावे . व. तसेच कंपनी वर मनुष्य वधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा .
अश्या अनेक ज्वलंत समस्या तात्काळ निकाली लागाव्या करिता प्रहार जन शक्ती पक्ष शाखा वरोरा यांनी आज ठीया आंदोलन करून मागण्या निकाली लावल्या …
यावेळी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते श्री आशिष घुमे , अक्षय बोंडगुलवार , शेरखान पठाण , मुजमिल शेख , सुहास हेपट , अमोल दातारकर , राकेश भुतकर , इत्यादी कार्यकर्त्या सह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .
विक्की नगराळे
चंद्रपुर शहर प्रतिनिधी
जिल्हा चंद्रपुर