BREAKING NEWS:
हेडलाइन

माहे जुन 2022 चे शिधावस्तुचे वितरण

Summary

माहे जुन 2022 चे शिधावस्तुचे वितरण कोंढाळी-वार्ताहर नागपूर जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्रातील पात्र सर्व कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांना माहे जुन, 2022 करीता शिधावस्तु वाटप परिमाण या प्रमाणे आहे. प्राधान्य गट- प्रती व्यक्ती 2 रुपये प्रमाणे 3 किलो गहु व प्रती व्यक्ती 3 […]

माहे जुन 2022 चे शिधावस्तुचे वितरण

कोंढाळी-वार्ताहर

नागपूर जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्रातील पात्र सर्व कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांना माहे जुन, 2022 करीता शिधावस्तु वाटप परिमाण या प्रमाणे आहे.

प्राधान्य गट- प्रती व्यक्ती 2 रुपये प्रमाणे 3 किलो गहु व प्रती व्यक्ती 3 रुपये प्रमाणे 2 किलो तांदुळ वितरित करण्यात येईल.

अंत्योदय गट – प्रती शिधापत्रिका 10 किलो गहू 2 रुपये प्रमाणे व प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ 3 रुपये प्रमाणे राहील. तसेच प्रती शिधापत्रिका 20 रुपये प्रमाणे एक किलो साखर वितरित करण्यात येईल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभाकरीता प्रती लाभार्थी 1 किलो गहु व 4 किलो तांदुळ मोफत वितरण करण्यात येईल, असे तालुका अन्नधान्य वितरण अधिकारी कमलेश कुंभरे यांनी कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *