कुंपनाच्या तार जाळीला बांधलेला जाळ्यात अडकून बीबटाच्या शावकाचा मृत्यु
Summary
कोंढाळी वनपरिक्षेत्रात शिकार्यांची टोळी सक्रिय? कुंपनाच्या तार जाळीला बांधलेला जाळ्यात अडकून बीबटाच्या शावकाचा मृत्यु कोंढाळी वनपरिक्षेत्रातील तिसरी घटना कोंढाळी वार्ताहर-कोंढाळी नागपुर वन विभागाच्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातील डोरली उपवनातील येनवीरा भागात (11मे रोजी) शिकार्याने लाऊन ठेवलेल्या जाळ्यात अडकून अंदाजे एक वर्षाचा […]
कोंढाळी वनपरिक्षेत्रात शिकार्यांची टोळी सक्रिय?
कुंपनाच्या तार जाळीला बांधलेला जाळ्यात अडकून बीबटाच्या शावकाचा मृत्यु
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील तिसरी घटना
कोंढाळी वार्ताहर-कोंढाळी
नागपुर वन विभागाच्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातील डोरली उपवनातील येनवीरा भागात (11मे रोजी) शिकार्याने लाऊन ठेवलेल्या जाळ्यात अडकून अंदाजे एक वर्षाचा बीबटाचा मृत्यु झाल्याची घटना 11 मे रोजी उघडकिस आली।
वन विभागाकडून मिळालाल्या माहितीच्या माहीती नुसार डोरली उपवनातील येनवीरा भागातील तलावालगतच्या शिवारात छाया श्रीधरराव हवाले यांचे शेत सर्हे क्र 122मधील शेतीच्या तारेच्या कुंपनाला बीबटाचे शावक फसुन असल्याचे या परिसरातील शेतकर्यांनी व नागरिकांनी 11मे च्या सकाळी नव साढे नव विजेता चे दरम्यान पाहिले,. नागरिकांनी या घटने ची माहीती या भागाचे वन कर्मचारी यांना दिली.स्थानीय वनकर्मचार्यांनी या बाबदची माहीती कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांना दिली । वनरिक्षेत्र अधिकारी ऑन डिवटी स्टाफ सह येनवीरा स्थळ गाठले, व या घटनेची माहीती उपविभागीय वन अधिकारी प्रज्योत पालवे व विभागीय वन अधिकारी डाॅ भारतसिंह हाडा यांना मिळताच वरिष्ठ वन अधिकारी डोरली उप वनाचे (मृत बीबट शावकाचे घटनास्थळ) घटनास्थळी पोहचून एन टी सी ए च्या आधारभूत नियमावली नुसार एन टी सी ए चे प्रतिनिधी अजिंक्य भटकर, वन्यजीव संरक्षण प्रतिनिधी उधमसिंह यादव, पशु वैद्यकियअधिकारी डा लाडूकर, यांचे समक्ष पशुवैद्यकिय अधिकारीकार्यांच्या त्रि-सदस्यीय चमु कडून टी टी सी नागपुर येथे डाक्टर लाडूकर, डाक्टर सुजीत कोलंगत, व डाॅक्टर मयुर फाटे यांनी शव विच्छेद केले।यात मृत शावक मादी असुन त्याचे वय अंदिजे 08ते10महिण्याचे असावे, व शावकाचा मृत्यु श्वास गुदमरून झाल्याचे प्रथमिक अहवालात सांगण्या आले आहे .
कोंढाळी वनपरिक्षेत्रात मागील आठ महिण्यात दो बीबटाचे शावक व एका मोठ्या अस्वलाचा तारात फसून मृत्यु झाल्या च्या घटना घडल्याने , कोंढाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणीशिकार्यांची टोळी सक्रिय झाली असावी असे ता भागातील नागरिकांचे म्हणने आहे। मिळालेल्या माहीतीनुसार 11मे रोजी मृत बिबटाचे शावकाच्या गळ्यात अडकलेला तारच्या जाळीचा फास्याचा उपयोग बहुतेक शिकार्यांच्या टोळी कडूनच शिकारी करिता वापरली जातात,.
कोंढाळी वन परिक्षेत्रातील वन्यप्राण्यांना पाण्याच्या पाण्याकरिता पाणवठ्याच्या सोयी नसल्याने वन्यप्राणी व हिंस्र वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याकरिता मनुष्य वस्ती कडे किंवा जंगल लगत शेतकर्यांचे गोठ्या कडे धाव घेतात , याची खबर बहुदा शिकार्याने असावी व नेमका त्याचा गैरफायदा शिकारी फासे लावून वन्यप्राण्याच्या शिकारी करीता कर असावे ।
कोंढाळी वन परिक्षेत्रातील वन विभागाकडून जंगलातील वन गस्त वाढविणे, वन्य प्राण्याना पिण्याच्या पाण्याकरिता पानवठ्याची सोय करने फारच गरजे असल्याचे ही सांगितले जाते।
11 मे रोजी मृत बिबटाचे शावकाच्या मृत्यु च्या तपास कामी श्वान पथकाची ही मदत घेण्यात आली मात्र श्वान पथकांकडून काहि निष्पंन्न झाले नाही।
या प्रकरणी एन टी पी ए च्या नियमावली नुसार नागपुर चे उपवनसंरक्षक डाक्टर भारतसिंह हाडा यांचे मार्गदर्शनाखाली ए सी एफ प्रज्योत पालवे व वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते व त्यांचा स्टाफ करत आहे।