मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना एमआरआय, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी यांसारख्या महागड्या सेवा माफक दरात मिळणार
Summary
जिल्हा ठाणे वार्ता:- मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना एमआरआय, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी यांसारख्या महागड्या सेवा माफक दरात मिळाव्यात यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून यांच प्रयत्नांतून पीपीपी तत्वावर कल्याण – डोंबिवली मनपा व क्रस्नाडायग्नोस्टिक प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील शास्त्रीनगररुग्णालय येथे […]
जिल्हा ठाणे वार्ता:- मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना एमआरआय, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी यांसारख्या महागड्या सेवा माफक दरात मिळाव्यात यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून यांच प्रयत्नांतून पीपीपी तत्वावर कल्याण – डोंबिवली मनपा व
क्रस्नाडायग्नोस्टिक प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील शास्त्रीनगररुग्णालय येथे सुरु करण्यात आलेल्या रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी केंद्राचे लोकार्पण मा. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यामुळे डोंबिवली व कल्याण परिसरातील नागरिकांना या डाग्नोस्टिक केंद्राचा लाभ घेता येणार असून येथील सर्व सुविधा अतिशय माफक दरात मिळणार आहेत. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, महापौर सौ.विनिता राणे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, कल्याण डोंबिवली आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, श्री.राजेश गोवर्धन मोरे, श्री.तात्यासाहेब माने, सौ.मंगला सुळे, सौ.किरण मोंडकर, सौ.कविता गावंड उपस्तित होते.
जगदीश जावळे
न्यूज रिपोर्टर
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य