ह्रदयस्पर्शी सुविचार —
-ह्रदयस्पर्शी सुविचार —
१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका…!!!
२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो…!!!
३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका…!!!
४) “मदत” एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात…!!!
५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते…!!!
६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते…!!!
७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात…!!!
८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही…!!!
९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…!!!
१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे…!!!
११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो…!!!
१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा…!!!
१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली…!!!
जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत…
“एक” आपण जन्मभर ज्या “मी” बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही…!!!
“दोन” जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही…!!!
“तीन” क्षणोक्षणीं प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!..!!!
मला कोणाची गरज नाही हा “अहंकार” आणि सर्वांना माझी गरज आहे हा “भ्रम” या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही…!!!
आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!
स्वत: ची व इतरांचीही काळजी घ्यावी