आम्हीच आमचे मारेकरी लेखक महेश देवशोध

प्रासंगिक
आम्हीच आमचे मारेकरी
लेखक
महेश देवशोध
पोलीस योद्धा वृत्तसेवा
मुंबई येथे 2 आणि 3 एप्रिल 2022 रोजी समाजाच्या विविध प्रश्नांवर चिंतन-मंथन करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
समाजातील काही मोजके बुद्धिजीवी विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सतत समाज चिंतन , मनन करीत आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे . विविध स्तरावर ऑनलाईन, ऑफलाइन चर्चासत्र आयोजित केले जात आहेत. ही बाब सुद्धा अभिनंदनीय आहे. पण माझ्यासारख्यांना नेहमी एक प्रश्न सतावतो तो म्हणजे चर्चेचा विषय , अनेकदा विषय पत्रिकेतील विषय पाहून डोके गरगरायला लागते आम्ही समाजाचा विकास कसा होईल . यावर चर्चा तर करतो पण आम्ही मूळ प्रश्नांना हात घालत नाही . त्यामुळे चर्चेअंती ज्या निष्कर्षावर यायला पाहिजे तेथ पर्यंत आम्ही पोहोचतच नाही . हे घडत नसल्यामुळे वेळ आणि पैसा सत्कारणी लागत नाही . हा माझाच नाही तर आजवर ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या बैठकांना आणि कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे त्या प्रत्येकाचा अनुभव आहे.
समाज एकता
समाज विकासाची
गुरुकिल्ली
मित्रहो ! देशातील वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन विविध गटागटात , संघटना विचारधारेत अडकलेल्या आहेत . आपला समाज एका झेंड्याखाली येऊन समाज हिताचा ठोस कार्यक्रम घेऊन सर्वांनी समाजाला सर्वतोपरी मानून हेवेदावे बाजूला सारून एका दिलाने काम करावे म्हणून मी स्वतः आणि समाजातील इतर मान्यवरांनी समाजाला एका धाग्यात बांधण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत आणि आजही चालू आहे . आजवरचा अनुभव असा आहे की मीटिंगमध्ये लोक बरेच येतात काही आपले विचार व्यक्त करतात नंतर फायदा तोटा बघत बसतात त्यामुळे एकतेची माळ काही केल्या गुंफल्या जात नाही .
आज समाजातील प्रत्येक घटकाला समाजाची चिंता आहे. पण समाजासाठी , समाज हितासाठी आपला अहंकार सोडायला कोणी तयार नाहीत. त्यामुळे समाजाचे सामाजिक , आर्थिक, शैक्षणिक , राजकीय , सांस्कृतिक नुकसान होत आहे . सार रूपात सांगावयाचे झाल्यास एखाद्या कुटुंबातील चार मुलं जशी आपली जन्मदात्री आई आजारी असल्याची चर्चा गावभर करतात पण प्रत्यक्षात तिला दवाखान्यात नेऊन उपचार कोणीच करत नाही . अशीच गत आमची आहे . आम्ही चर्चा खूप हाय लेव्हलच्या करतो पण समाज रुपी आईची सेवा ज्या आत्मियतेने करायला हवी ती मात्र करत नाही . आणि दोष मात्र इतरांना देत आहोत!! खरे पहता आम्हीच आमचे मारेकरी आहोत .
यापुढे जर समाजासाठी कोणीही व्यक्ती विशिष्ट बाह्य विचारधारेचे आमचे बांधव , सामाजिक संघटना वाले आपला हट्ट आणि स्वार्थ सोडायला तयार नसतील , एकतेचे महत्व त्यांना पटत नसेल तर त्यांना वगळून पुढे जाण्याचा संकल्प करावा . हांजी हांजी करण्याचा प्रकार आता थांबवला पाहिजे .
विना नेतृत्वाच्या लढाईने समाजाच्या पदरात काहीही पडणार नाही . बांधवांनो!! जसे विना इंजीन आणि बिना ड्रायव्हरची गाडी कुठेही पोहोचवू शकत नाही. तसेच बिना नेतृत्वाच्या चळवळी समाजाला कोणता न्याय मिळवून देऊ शकत नाही . ज्या समाजाला सक्षम नेतृत्व नाही . त्या समाजाला सध्याच्या काळात कोणीही विचारत नाही . हे वास्तव आम्ही कोणीही स्वीकारायला तयार नाही . आज राष्ट्रीय पातळीवर आमच्या समाजाला सक्षम नेतृत्व नसल्याकारणाने आमचे कोणतेही प्रश्न सुटेनासे झालेले आहेत . समाजाला माझा प्रश्न आहे की बिन नेतृत्वाच्या वांझोट्या चर्चा आपण किती दिवस करणार आहोत . खरे तर आम्ही नेतृत्वाचा प्रथम शोध घ्यायला हवा तसे न करता बिन इंजन बिना ड्रायव्हरच्या गाडीत बसून आम्ही आमच्या गंतव्य ठिकाणापर्यंत सहज पोचू शकतो हा भाबडा विश्वास ठेवून आम्ही बैठकांवर बैठका आयोजित करीत आहोत . आजवरच्या बैठकांतून हाती काही लागले नाही म्हणून माझा आग्रह आहे. की 2 आणि 3 एप्रिल च्या कार्यशाळेत राष्ट्रीय पातळीवर सक्षम पणे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचा शोध घेणे याला आपण प्राधान्य द्यावे असे मला वाटते .
हजारो वर्षापासून चालणारी आमची तांडा व्यवस्था नवीन नेतृत्व, नवीन नेतृत्वाची चालू आहे .?? का ?? नायक आणि कारभारी हे नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आमच्या समोर असतांना आम्ही मात्र नेतृत्व विना समाज विकास करू इच्छित आहोत जे की हास्यास्पद आहे . सर्वांकडे शंकेने पाहण्याऐवजी आपण कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल . आमच्या जोपर्यंत एक वाक्यता येणार नाही . तोपर्यंत आमच्या चर्चा निरर्थक आहेत .
दुसऱ्या जातीचे आमदार , खासदार आमच्या समाजाचे प्रश्न संसदेत , मीडियासमोर राष्ट्रपतीकडे ,मांडत असतील तर आमच्यासाठी यापेक्षा शरमेची दुसरी काय बाब असू शकते ? ही वेळ आज आलेली आहे . याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे राष्ट्रीय नेतृत्वाचा शोध घेण्याला आम्ही कधीही प्राधान्य दिलेले नाही .
आज ना आमच्याकडे नेतृत्व आहे . ना ठोस कार्यक्रम किंवा उद्देश यामुळेच अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नाही . फक्त चर्चा पे चर्चा चालू आहेत. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे .
या दोन दिवसीय कार्यशाळेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेल्या विषयावर बोलायचे मुद्दाम मी टाळत आहे . याचे उत्तर वरील विवेचनात सापडेल . या कार्यशाळेकडून माझ्या काही वाजवी अपेक्षा आहेत .
१) सामूहिक नेतृत्व आले समाजाचे प्रश्न सुटणे अवघड आहे म्हणून राष्ट्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व उभे करता येईल.
२) तीन किंवा पाच वर्षाचा ठोस कार्यक्रम असावा .
३) विशेषता आपण आधुनिक युगात आहोत . याचे भान ठेवून आणि त्याबरोबर संविधानाच्या चौकटीत बसणारे विषय चर्चेला घेतले जावेत .
४) आपली लढाई सरकार विरुद्ध आहे . संवैधानिक न्याय व हक्क देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते आणि म्हणूनच आपला संघर्ष सरकारविरुद्ध असावा . कोणतीही जात धर्म , नसावा . याचेही भान आपण विविध विषयावर चर्चा करतांना असावे
या कार्यशाळेकडून वरील वाजवी अपेक्षा करून थांबतो. पुनश्च एकदा आभार !
जय सेवालाल जय वसंत
महेश देवशोध
वर्धा , जिल्हा प्रतिनिधी