भू वैज्ञानिक कार्यालय द्वारा -जल पुनरभरण चे प्रात्यक्षिक
Summary
भू वैज्ञानिक कार्यालय द्वारा -जल पुनरभरण चे प्रात्यक्षिक नागपूर/काटोल प्रतिनिधी- दिनांक 22 /3/ 2022 रोजी जागतिक भूजल दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय नागपूर मार्फत पदव्युत्तर भूशास्त्र विभाग राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील शासकीय इमारतीचे पाऊस पाणी संकलन […]

भू वैज्ञानिक कार्यालय द्वारा -जल पुनरभरण चे प्रात्यक्षिक
नागपूर/काटोल प्रतिनिधी-
दिनांक 22 /3/ 2022 रोजी जागतिक भूजल दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय नागपूर मार्फत पदव्युत्तर भूशास्त्र विभाग राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील शासकीय इमारतीचे पाऊस पाणी संकलन करून रिचार्ज शाफ्ट द्वारे भूजलाचे पुनर्भरण करणे ही उपायोजना जिल्हा नियोजन समिती नागपूर अंतर्गत नाविन्यपूर्ण योजने मधून मंजूर असून या उपाययोजना चे भूमिपूजन तसेच कामाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर दुधै साहेब नागपूर प्रादेशिक उपसंचालक डॉक्टर पद्मने साहेब यांच्या शुभहस्ते तसेच भूशास्त्र विभागाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक वरिष्ठ भूवैज्ञानिक नागपुर डॉक्टर वर्षा माने वरिष्ठ भूवैज्ञानिक उपसंचालक कार्यालय नागपूर श्री मंगेश चौधरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे भूवैज्ञानिक श्रीमती घोडेस्वार श्री राजेश गावंडे भूशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर दुधै साहेब यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाच्या ग्रामीण भागातील विविध योजने अंतर्गत केलेल्या कामाची प्रशंसा करून सदर विभागास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या- प्रादेशिक उपसंचालक डॉक्टर शिवाजी पद्मने यांनी भूजल पुनर्भरण तांत्रिक पद्धतीने कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले