आर्वी येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

▪ आर्वी येथे शिवजयंती
जल्लोषात साजरी ▪
▪ शिवसेनेने काढली भव्य रॅली▪ शंभराहून अधिक महिलांचा
होता समावेश▪
▪ ऐतिहासिक दृश्याने डोळ्याचे
पारने फिटले▪
▪ आर्वीकरांकडून मिळाली
यशस्वितेची पावती▪
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
शिवसेनेने तिथीप्रमाणे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी तारीख 21 जल्लोषात साजरी केली . येथील गांधी चौक मधून काढलेल्या भव्य अशा रॅलीमध्ये शिवरायाच्या आठवणी उजागर करणारा जिवंत देखाव्यांचा समावेश होता . कधी नव्हे ते यावेळी शंभराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे व वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर यांच्या निर्देशानुसार शिवसेनेचे वर्धा जिल्हा उपप्रमुख दशरथ जाधव , शहरप्रमुख राजू पालीवाल माजी शहरप्रमुख गुड्डू गावंडे , नरेश वडणारे संघटक दिपक लोखंडे , महिला जिल्हा संघटिका सविता पुरी यांच्या नेतृत्वात ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती.
सकाळी दहा वाजता की सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाजी चौकातील अश्वारुढ पुतळ्याचे व जनता नगर मधील पुतळ्याचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास येथील गांधी चौका मधून रॅलीची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ, पालखी , अभिषेक करताना छत्रपती शिवराया , उपदेश करताना संत तुकोबाराया ,उपदेश करतांना जिजाऊमाता , शिवरायांचे मावळे आदी दृश्यांचा समावेश होता . याशिवाय महिला भजन मंडळाने सुद्धा यात आपला सहभाग नोंदविला होता.
सायंकाळी सहा वाजता निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक , विश्रामगृह , विठ्ठल मंदिर, गुरूनानक चौक , मारुती मंदिर,कन्नमवार शाळा ,राम मंदिर, मायबाई मंदिर, मायबाई वॉर्ड , गांधी चौकात या रॅलीचा समारोप झाला.
रॅलीच्या आयोजनाकरिता माजी शहर प्रमुख नितीन वडणारे, संजय गुल्हाने, महेश देवशोध ,अनिरुद्ध देशपांडे ,सर्वेश देशपांडे, विजय बोल वे शशी हु संगे श्याम पोकळे राहुल ठाकरे गौरव देशमुख प्रकाश खोडके मनीष प्रकाश खांडेकर पंकज जयस्वाल अजय शंकर धीरज लाडके नानू थोरात कामगार संघटनेचे लोकडे गुल्हाने पवन ढोले राजू सदाफळे श्रीमती हरमकर अनिताताई लोखंडे मंजुषा हटवार संगीता नि गोड रीना ताई काळबांडे बेबीताई नाखरे अर्चना दाभाडे ज्योती हरणे आदींनी परिश्रम घेतले.