हेडलाइन

उखर्डा गावातील अवैध दारु विक्री बंद करा     महिलांची ठाणेदाराला निवेदनाद्वारे मागणी.

Summary

उखर्डा गावातील अवैध दारु विक्री बंद करा महिलांची ठाणेदाराला निवेदनाद्वारे मागणी.   संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….   वरोरा…….उखर्डा येथील महिलांची गावांतील दारू बंद करावी यासाठी वरोरा पोलीस स्टेशन वर धडक देऊन पोलीस स्टेशन येथे निवेदन व […]

उखर्डा गावातील अवैध दारु विक्री बंद करा

महिलांची ठाणेदाराला निवेदनाद्वारे मागणी.

 

संदीप तुरक्याल

चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

 

वरोरा…….उखर्डा येथील महिलांची गावांतील दारू बंद करावी यासाठी वरोरा पोलीस स्टेशन वर धडक देऊन पोलीस स्टेशन येथे निवेदन व लेखी तक्रार देण्यात आली. गेल्या एका वर्षापासून गावात सर्रास दारू विक्री सुरू आहे, पोलीस स्टेशन ला तक्रार देऊन सुद्धा अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. आदर्श गाव पुरस्कार प्राप्त गावात अश्या प्रकारे दारूची बाटली रिकामी होत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. ज्या गावाचे नाव महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कार्याने व गुरुदेव सेवा मंडळ ने नेले त्याचं गावात दारू विक्री सुरू आहे. ग्राम पंचायत सुद्धा फक्तं बघ्याची भूमिका घेत आहे. अनेकांनी दारू बंद करण्याच्या प्रयत्न केला पण अजुनही सर्रास दारू विक्री सुरू आहे. गावातील महिलांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो आहे. गावातील महिलांना शिवीगाळ केली जाते व तक्रार करणाऱ्यास धमकी देण्यात येतात. गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावातील नागरिक संतप्त झाले आहे.

सकाळी उठून चहा चे आधीं लोकं दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत. गावात भांडण, झगडे मारणारी चे सत्र सूरू झाली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून गावातील महिलांची गावांतील दारू बंद करावी अशी मागणी केली आहे पण पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. गावातील अवैध दारू विक्रेत्याच्या मुसक्या आवळा अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

महिलांनी वरोरा पोलीस स्टेशन वर धडक देऊन दारू बंद करावी अशी विनंती केली. महिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दारू विक्रेत्यांच्या भीतीने कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही.

त्यामुळे संतप्त गावातील महिला ज्योती श्रीरामे, रेखा भोयर, शशिकला रामटेके, अंजना कुडे, इंदुबाई किन्नाके, रीना कीन्नाके, धोटे, दुर्गा परचाके तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजीत कुडे, आदर्श गाव ग्राम कार्यकर्ता संजय धोटे, सोपान कुडे, ईश्वर पुसदेकर इत्यादी पोलीस स्टेशन वरोरा येथे निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *