हेडलाइन

चार दिवसा पासुन कन्हान ला रोजंदारी स्वच्छता कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन सुरू

Summary

चार दिवसा पासुन कन्हान ला रोजंदारी स्वच्छता कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन सुरू   कन्हान : – येथील स्वच्छता रोजंदारी कंत्राटी कर्मचारी वाढत्या महागाईने कमी रोजंदारीत परिवारांचा उदर्नि वाह करणे कठीण होत असल्याने वारंवार रोजंदीरी वाढविण्याची मागणी करून सुध्दा दबावशाहीने कर्म […]

चार दिवसा पासुन कन्हान ला रोजंदारी स्वच्छता कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन सुरू

 

कन्हान : – येथील स्वच्छता रोजंदारी कंत्राटी कर्मचारी वाढत्या महागाईने कमी रोजंदारीत परिवारांचा उदर्नि वाह करणे कठीण होत असल्याने वारंवार रोजंदीरी वाढविण्याची मागणी करून सुध्दा दबावशाहीने कर्म चा-याना कमी रोजीत काम घेऊन मौलिक हक्का पासु न वंचित ठेवण्यात येत असल्याने चार दिवसा पासुन शांततेत काम बंद आंदोलन सुरू करून संबधित अधि का-याना निवेदन देऊन शासन नियमानुसार भविष्य निर्वाह निधी भरून ३५० रूपये प्रति दिवस हक्काची रोजी मिळण्याची मागणी न प कंत्राटी रोजंदारी स्वच्छता कर्मचा-यांनी केली आहे.

कन्हान ग्राम पंचायत ते नगरपरिषदेत मागील १० ते १५ वर्षा पासुन शहरात स्वच्छता करण्याचे काम आम्ही रोजंदारीने करित आहोत. नगरपरिषदेचा स्व च्छता कंत्राटदार हा आम्हचे भविष्य निर्वाह निधी न भरता फक्त २६० रूपये प्रतिदिनाची रोजी देत अस ल्याने आम्ही रोजी वाढविण्याची मागणी कंत्राटदारा ला केली. तर २६० रूपये रोजीने काम करायचे असेल तर करा. नाही तर तुम्हाला काढुन दुसरे कर्मचारी ठेवी ल. नविन लोक काम करायला तयार आहे. कोरोना काळात महागाई मोठया प्रमाणात वाढली असल्याने परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने न प प्रशासनास व कंत्राटदारास रोजी वाढविण्याची वारंवार मागणी केली. कंत्राटदार व न प प्रशासन काम करवुन घेते. रोजी वाढविण्यास कंत्राटदार व न प प्रशासन अधिकारी, पदाधिकारी दुर्लक्ष करित असल्याने कोरो ना नंतर वाढलेल्या महागाईने कमी रोजीत काम करू न जिवन जगणे भयंकर कठीण झाले. यास्तव रोजी रोटीच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करून शासनाच्या नियमानुसार कमीत कमी ३५० रूपये रोजी कंत्राटदा रा कडुन मिळण्याकरिता कंत्राटी रोजंदारी कर्मचा-यां नी न्यायीक हक्काची मागणी करित सोमवार (दि.७) मार्च पासुन शांततेत काम बंद आंदोलन सुरू करून चार दिवस झाले असल्याने कंत्राटदार व नप पदाधि कारी, अधिकारी दडपशाही करून जर न्याय हक्का पासुन वचिंत करण्याचा पर्यंत करतील तर आम्हच्या सहन शक्तीचा बांध फुटुन उदभवणा-या परिणामास नगरपरिषद कन्हान-पिपरी व संबधित अधिकारी जिम्मेदार राहतील. यास्तव मा. जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी, पदाधिकारी हयाना निवेदन देऊन शासन नियमानुसार भविष्य निर्वाह निधी भरून ३५० रूपये प्रति दिवस रोजंदारी मिळण्याची मागणी कंत्रा टी स्वच्छता कर्मचारी रेखा कुलदिप, किरण जैवदिया, लता शेवते, शकिला नागदेवे, गणेशी सारवन, बबिता चव्हाण, इंदु मेश्राम, अंजिरा चव्हाण, रेखा देवागन, उषा शेंडे, शालु शेंडे, एकता अंबादे, अजय हातागडे, मन्नु हातागडे, विशाल लोंढे, शाहील हातागडे, गुलशन लोंढे, शुभम हातागडे, गोवर्धन वर्मा, संजय दुधबावने, रवी गोंडाणे, ओमप्रकाश देवागन, किशन कुलदिप, रोहीत कुलदिप, महेंद्र वानखेडे, महादेव खोब्रागडे,राज भालेकर, जितु शेवते, पिंटु कठाने, मनोज मधुमटके, अल्केश टेभुर्णे, पंकज जुमैल, संतोष मधुमटके, मनोज मलिक, ओमप्रकाश परिहार आदीने केली आहे.

संजय निंबाळकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *