डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणा ऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी
डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणा ऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी
कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत गृहमंत्रीना निवेदन.
कन्हान : – मोर्शी तालुक्यात रिध्दपुर गावात असले ल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केल्याचा जाहिर निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी कन्हान पोस्टेचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत गृहमंत्री हयाना निवेदन पाठवुन तात्काळ पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
अमरावती जिल्हा मोर्शी तालुक्यातील रिध्दपुर गावात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली आहे . या प्रकरणा नंतर नागरिका मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने कन्हान येथे त्यांच्या निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी मंच अध्यक्ष ॠृषभ बावन कर यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन त्यांचा मार्फत राज्याचे गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील हयांना निवेदन पाठवुन तात्काळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करून त्यांच्या वर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, सचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सदस्य हर्ष पाटील, शाहरुख खान, चंदन मेश्राम सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर, नागपूर