हेडलाइन

डॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर…गडचिरोली जिल्ह्यातून कुसुम राधेश्याम भोयर

Summary

डॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर…गडचिरोली जिल्ह्यातून कुसुम राधेश्याम भोयर जालना – डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ आज संघटनेचे संस्थापक […]

डॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर…गडचिरोली जिल्ह्यातून कुसुम राधेश्याम भोयर

जालना – डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी दिले जाणारे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर व संघटनेचे प्रदेशाध्य लक्ष्मण नेव्हल यांनी जाहीर केले.

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी प्रती वर्षी क्रिडा ,शिक्षण,समाजकारण,संशोधन,अर्थकारण,राजकारण,प्रशासकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मान केला जातो.आज सदरील राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ साठी राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून आपल्या कार्याने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हिरकणी ची निवड घोषित करण्यात आली यात डाँ.आर्चना भोसले ,जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा शासकीय रुग्णालय ,जालना, कु.श्रुतिका जयकांत सरोदे रोलर स्केटींग,पुणे ,सौ.सारिका अंबादास रोकडे ,परभणी,सौ सविता प्रभाकरराव पराड पाटील संस्थापक अध्यक्ष, गोदावरी मल्टीस्टेट को आँप क्रेडिट सोसायटी लि गेवराई जि बीड, डाँ.मालिनी मोहन वडतकर, वर्धा, श्रीमती भावना हेमंत पाटील पद शिक्षणविस्तार अधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग धुळे, कु.अंकिता एकनाथ बाविस्कर [ पाटील ] पोलिस उपनिरीक्षक अक्कलकुवा पोलिस स्टेशन ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार, डाँ.माधुरी तुकाराम भोसले (फड) ,सोलापूर, सौ कुसुम भोयर राधेश्याम भोयर , गडचिरोली, डाँ.रुपाली सावळे ,अकोला, शिवमती माधुरी मडावी यवतमाळ,शिवमती मंगला नितीन उंडे,नायब तहसिलदार,भातकुली जि.अमरावती डॉ. प्रविणा प्रमोद शहा प्राचार्या, श्री अ.खि. नॅशनल हाय. व ज्यु. कॉलेज, खामगाव जि. बुलडाणा, श्रीमती वंदना प्रभाकर फुटाणे ,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, लातूर ,जयश्रीताई निलेश पावडे महापौरनांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सौ रत्ना तुळशिराम भदाणे ग्रेडेड मुख्याध्यापिका जि.प. प्रा.शाळा शिरूड ता.अमळनेर जि. जळगाव,शिवमती प्रिया प्रदीप पाठकसामाजिक कार्यकर्ता,वाशिम, सौ.भारती अनिल पाटील शिक्षण ,अर्थ व क्रिडा सभापती जि.प. नागपूर यांचा समावेश आहे.

सदरील राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ मिळविणार्या सर्व हिरकणीचे सर्वत्र कौतुक होत असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, प्रदीप दादा सोळंके ,सुनील चव्हाण ,सतीश काळे ,कैलाश राऊत, प्रा.शेषराव येलेकर ,दयानंद जाधव ,शांताराम जळते ,संजय निंबाळकर,प्रभाकर पराड ,शामराव लवांडे ,लीलाधार पाटील ,डॉ.विलास पाटील, राजेंद्र भोयर ,प्रशांत खाचणे ,अनंत मिटकरी , कृष्ण वाघ , विठ्ठल घायाळ ,अनिल घोरपडे ,वल्लभ गाडे,भास्कर शिंदे ,भास्कर कढवने आदिनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *