कन्हान नदी नविन पुलाचे बांधकाम लवकर पुर्ण करून वाहतुक सुरू करा
कन्हान नदी नविन पुलाचे बांधकाम लवकर पुर्ण करून वाहतुक सुरू करा
कन्हान : – नदीचा इंग्रज काळीन कालमर्यादा शंभर वर्ष पुर्ण होऊन दिडशे वर्षही पुर्ण झाल्याने जिर्ण होत रेल्वे फाटक वेळोवेळी बंद होत पुलावर वाहनाच्या रांगाच रांगा लागुन जड वाहतुक जोमाने सुरू असल्या ने कुठल्याही वेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकरता येत नसल्याने कासव गतीने सुरू असलेले नविन पुलाचे बांधकाम लवकर करून वाहतुकीस सुरू करण्याची मागणी राष्ट्रहित व जनहित ऑटो युनियन कन्हान व्दारे मा. जिल्हाधिकारी नागपुर हयाना शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे.
कन्हान नदीवरील नविन पुलाचे बांधकाम कासव गतीने नव्वद प्रतिशत झालेले असुन खरे अँन्ड तारकुंडे कंपनी ने उर्वरीत काम सोडुन पसारा झाली. ह्या नविन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे. या करीता राष्ट्रहित ऑटो युनियन नागपुर ग्रॉमिण अध्यक्ष श्री.नरेन्द्रजी वाघमारे यांच्या नेतुत्वात राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान कार्याध्यक्ष बाळुभाऊ नागदेवे, जनहीत युनियन अध्यक्ष नरेंद्र पात्रे, असल जोसफ, कैलास खोबरागडे, गज्जु बल्लारे, सुवर्णा गायकवाड, विनोद रंगारी, शेखर पेटारे, चंदरू पात्रे, देवचंद कोरडे, रामलाल पात्रे आदी च्या शिष्टमंड ळाने मा. विजयाताई बनकर निवासी उपजिल्हाधिका री यांना नागपुर जिल्हा कार्यालयात भेटुन कन्हान नदी वरील नविन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्या बाबत निवेदन देऊन मागणी केली.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535