जीवनाच्या प्रवासात योग साधना आवश्यक – विजयराव कठाळकर
जीवनाच्या प्रवासात योग साधना आवश्यक – विजयराव कठाळकर
कन्हान : – मनुष्याचे जीवन संघर्षमय असते. हा जीवन प्रवास सुकर करायचा असेल तर योग साधना करणे खुप महत्त्वाचे आहे. असे मत श्री साई सेवा शिक्षण मंडळाचे संस्था सचिव विजयराव कठाळकर यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकास विद्यालय सालवा येथे श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिविंग या संस्थे द्वारा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय शिबिराच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव विजयराव कठाळकर, प्रमुख पाहुणे निसतखेडा येथील प्रयोगशील शेतकरी रंजीत गिवतोंडे, शिबिराच्या मार्गदर्शिका प्रतिभा शेट्टी, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मोटघरे हे होते. या शिबिरात वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष योग आणि वर्ग ८ ते १३ च्या विद्यार्थ्यांसाठी मेधा योग हे दोन अभ्यासक्रम घेण्यात आले. या दोन्ही प्रकारच्या योग साधनेतुन विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि ग्रहण क्षमता विकसित होते तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. असे या शिबिराच्या मार्गदर्शिका प्रतिभा शेट्टी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रयोगशील शेतकरी रंजीत गिवतोंडे यांनी आपल्या पृथ्वीच्या संर क्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले गाव ते शाळा या दरम्यान रस्त्यावर दोन झाडे लावावीत असे विद्या र्थ्यांकडुन वचन घेतले. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मीकां त बांते यांनी तर आभार मयुर भोंबे यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535
