हेडलाइन

आता!आम्ही ही लसवंत! कोंढाळी प्राआ अंतर्गत 1970 विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण

Summary

आता!आम्ही ही लसवंत! कोंढाळी प्राआ अंतर्गत 1970 विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण कोंढाळी-वार्ताहर- ओमायक्रॉनमुळे उद्भवणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या दक्षतेसाठी सोमवारपासून कोंढाळी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे लसीकरण कॅम्प लाऊन१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले […]

आता!आम्ही ही लसवंत!

कोंढाळी प्राआ अंतर्गत 1970 विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण

कोंढाळी-वार्ताहर- ओमायक्रॉनमुळे उद्भवणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या दक्षतेसाठी सोमवारपासून कोंढाळी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे लसीकरण कॅम्प लाऊन१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. याशिवाय केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीद्वारेही लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कोंढाळी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १९५० पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती काटोल तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे, तसेच कोंढाळी येथील वैद्यकीय अधिकारी डाक्टर अनिल मडावी यांनी दिली. यामध्ये वर्ष२००७ वा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना कोविन ॲपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते. याशिवाय लसीकरण केंद्रांवरही नोंदणीची सुविधा राहणार आहे.

कोंढाळी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे जि प सदस्य पुष्पाताई चाफले, सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास ,प्राचार्य गणेश सेंम्बेकर , पं स सदस्य संजय डांगोरे, लता ताई धारपुरे, अरूण उईके, बी डी ओ संजय पाटील, ग्रा प सदस्य प्रमोद चाफले, नितीन देवतले, प्रमोद धारपुरे यांचे उपस्थितीत आरोग्य अधिकारी डाक्टर अनिल मडावी, विजय माहूरे, आ.से. राकेश थूल, रूपाली तिडके,दिपाली उमाळे , भूषण गटलेवार, तसेच आरोग्य सेवक नरेश तायडे यांनी येथील 15ते18वर्ष वयो गटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.

लाखोटीया भुतडा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात तसेच सी बी एस ई हायस्कूल मधे १५ते १८वयोगटातील १२५० पात्र लाभार्थी आहेत अशी माहीती प्राचार्य गणेश सेंम्बेकर व ज्योती राऊत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *