हेडलाइन

मुक्तीपथ मूलचेरा तर्फ़े व्यसनमुक्तीवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Summary

मुक्तीपथ मूलचेरा तर्फ़े व्यसनमुक्तीवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न   आष्टी:-सर्च फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुक्तीपथ संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती वर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे दिनांक 29.12.2021 रोज बुधवारला […]

मुक्तीपथ मूलचेरा तर्फ़े व्यसनमुक्तीवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

आष्टी:-सर्च फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुक्तीपथ संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती वर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आमच्या राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे दिनांक 29.12.2021 रोज बुधवारला रुपेश अंबादे मूलचेरा तालुका मुक्तीपथ समन्वयक यांनी व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजच्या युवक व युवतींनी स्वतःला व आई वडिलांना व्यसनापासून कसे मुक्त ठेवावे हे सांगितले तसेच त्यांनी व्यसनामुळे आपला पैसाही खर्च होतो व आपले आरोग्यही बिघडते

म्हणून व्यसनापासून दूर राहा व चांगले शिक्षण घेऊन चांगले जबाबदार नागरिक बना असा विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला कार्यक्रमाचे संचालन मेघश्याम भोयर यांनी केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नारायण बोरकुटे, रथीन्द्र सरकार, मंटू सरकार, सुरेश ब्राह्मणकर,जाईद शेख, यादव मडावी,राजेंद्र लाकडे, दिपक नाइकवार, कल्पना गुंडावार आदी शिक्षक व दिवाकर गेडाम लिपिक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देण्यात आली.

 

शेषराव येलेकर

विदर्भ चीफ ब्यूरो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *