बेले सर एज्युकेशन व्दारे उत्कृट विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरव
बेले सर एज्युकेशन व्दारे उत्कृट विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरव
कन्हान : – स्थानिय बेले सर एज्युकेशन यांच्या विद्य माने विद्यार्थ्याची चार गटात रंगभरण, सामान्य ज्ञान, निबंध स्पर्धे ची परिक्षा घेऊन उत्कृष्ट प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याना प्रमाणपत्र, पदक व पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला.
शनिवार, रविवार ला बेले सर एज्युकेशन व्दारे शालेय विद्यार्थ्याची चार गटात रंगभरण स्पर्धा, दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यानी उत्फुर्तपणे सहभाग घेतला. रंगभरण स्पर्धेत साईमा मनगटे, साई हेटे, आभा ओमरे, श्रावणी धोटे तर सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेत सन्मुख सित्तुरी, राघव राऊत, अनुज वाटकर, उत्कर्ष रहाटे हयानी बाजी मारली. चिमुकल्यासाठी आयोजित निबंध स्पर्धेत मनुश्री पोटभरे, हर्शित काठोके, गार्व्ही मेंढे, हर्षल लेंडे विजयी ठरले. प्राविण्य प्राप्त यशस्वी विद्यार्थ्याना राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक चे उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बेले यांचे हस्ते प्रमाणपत्र, पदक आणि पारितोषिक वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्विते करिता वर्षा मँडम, शोभा मँडम आणि समिक्षा वाकुडकर आदीने प्रयत्न केले.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535