कोंढाळी येते शीत शव पेटी उपलब्ध कोंढाळी व्यापारी संघटने कडून नवीन शीत शव पेटी ची खरेदी

कोंढाळी येथे शीत शव पेटी उपलब्ध
कोंढाळी व्यापारी संघटने कडून नवीन शीत शव पेटी ची खरेदी
लोकार्पण :
नाममात्र आकारले जाणार शुल्क
कोंढाळी येथील व्यापारी वर्गाने ५३ हजार रूपये खर्चुन नवीन शीत शव पेटी खरेदी केली आहे. सदर शीत शव पेटीचे लोकार्पण ग्राम पंचायत कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास तथा ज्येष्ठ ग्रा प सदस्य संजय राऊत,बालकिसन पालीवाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांचे उपस्थितीत शनिवार 25डिसेंबर रोजी दुपारी 12-00वाजता येथील व्यापारी संघटने चे पदाधिकारी विजय मुंधडा,दिनेश धारण,सुनिल डांगरा, सचिन सावरकर,विनोद जाऊळकर, सुनिल चन्ने,सुरेंद्र भाजीखाये, कुणाल भांगे,धोटे, यांनी येथील माहेश्वरी सभागृहात शीत शव पेटी चे लोकार्पण केले.
शीत शव पेटीत एक ते दोन दिवस मृतदेह ठेवायचे असल्यास सदर शीत शव पेटी कोंढाळी व लगतच्या नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे. शव पेटी विद्युतवर काम करणारी आहे. नागरिकांच्या मागणीनुसार सदर शव पेटी उपलब्ध करून दिली जाणार आहे व प्रत्येक दिवसानुसार भाडे आकारले जाणार आहे अशी माहीती ही सचीन सावरकर व सुरेंद्र भाजीखाये यांनी दिली आहे .
कार्यक्रमाचे संचलन सुरेंद्र भाजीखाये तर कोंढाळी चे उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी कोंढाळी येथील व्यापारी बांधवांचे आभार मानले.