ओ बी सी आरक्षण नाही तर निवडणूक नाही…. दीलीपभाऊ उके – माजी जिल्हा परिषद सदस्य, भंडारा

प्रतिनिधी/मोहाडी
बहुजनांच्या कल्याणासाठी सदैव संघर्षाची ज्योत पेटवून ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले असे आमचे दैवत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहितांना या देशाचा ओबीसी समाजाच्या मागास पणा दुर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कलम 340 लिहून ओबीसींना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आपली निष्पक्षता सिद्ध केली. पण आमच्याच त्या काळाचे तथाकथित ओबीसी नेते यांनी उच्चवर्णीय नेत्यांच्या स्वार्थासाठी बाबा साहेबांनी घटनेत लिहिलेल्या कलम 340 चा विरोध केला आणि आम्हाला कायमचा मागास ठेवण्याची व्यवस्था केली. म्हणून ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आज पर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजनैतिक घटनात्मक अधिकार मिळाले नाही हे या देशातील तमाम ओबीसी समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल.म्हणुन आज सर्वच क्षेत्रात ओबीसी समाज मागास राहुन आपल्या न्याय व अधिकारा पासुन वंचित आहे.
केंद्र सरकारने 73 वी घटना दुरुस्ती करून प्रत्येक राज्यात त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना स्वतंत्र अधिकार बहाल करून त्यांना अधिक महत्त्व प्राप्त करून दिले तेव्हा पासूनच त्या निवडणुकीचे महत्त्व वाढले हे म्हणायला हरकत नाही.
त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करुन येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्यत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना मिळत असलेले आरक्षण आज पर्यंतचा कोणत्याही राज्य सरकारने देत असलेले आरक्षण हे कोणत्या आधारावर देत आहे हे पुरावे न्यायालयात पेश करुन न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे रद्द केले आहे.
मी स्वतः 21 डिसेंबर ला होऊ घातलेल्या त्या निवडणुकीत वरठी प.स. क्षेत्रातून सर्वसाधारण जागेवर भारतिय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिली आहे पण जो पर्यंत ओबीसींना मिळत असेलले आरक्षण पूर्ववत होणार नाही तो पर्यंत मी निवडणूक लढविणार नाही,मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार असून ही माझी व्यक्तिगत भुमिका आहे.म्हणुन कोणत्याही कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माझा प्रचार करु नये अशी विनंती करीत आहे..
.🙏🙏🙏 आपला स्नेहांकित ~ दिलीप उके वरठी.
असे मीडिया शी बोलताना दिलीप उके यांनी सांगितले