आळंदी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्याचां मोठा अपघात

मावळ – आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजिवनी समाधी साठी माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उंबरे (ता.खालापुर) पायी चालत जात असताना दिंडीला मागुन येणाऱ्या पिकअप टेम्पो( क्र. MH 12 SX 8562) ने जोरात वेगाने येत दिंडीत शिरली, त्यामुळे मोठा अपघात घडला. हि घटना (दि.२७) सकाळी ७ वाजता घडली या दुर्दैवी घटनेत दोनजणांचा मृत्यू आणि २५ ते ३० महिला जखमी झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सोहळ्या निमित्ताने दरवर्षी वारकरी मोठ्या भक्ती – भावाने वारीला जातात, कोरोना मुळे दोन वर्षे वारीला वारकऱ्यांना जाता आले नव्हते, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वारकरी मोठ्या प्रमाणात जात आहे. तसेच कोकणातील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उंबरा (ता.खालापुर) या दिंडी सोहळ्यात सुमारे २०० ते ३०० वारकरी पायी चालत आळंदी च्या दिशेने जात होती.
सदर मिळालेल्या माहितीनुसार कामशेत हद्दीतील नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालय काल (शुक्रवारी २६) रोजी त्यांचा मुक्काम होता. पहाटे सहाच्या सुमारास पालखीने आळंदी दिशेने प्रस्तान केले. सकाळी ७ च्या सुमारास दिंडी साते फाटा येथील आदिती हॉटेल जवळ आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप टेम्पो पायी चालणाऱ्या दिंडीत घुसला. या दुर्दैवी घटनेत अनेक जन जखमी झाले असून दोन जन मृत्यूमुखी पडले. मृत्यू झालेल्यांची नावे जयश्री आत्माराम पवार(वय ५५.रा.भुतावली ता. कर्जत जि. रायगड) कुसुम यरम(वय ५५.रा.उबरे ता. खालापूर) अशी आहेत.
तर जखमी भाविकांना बडे हॉस्पिटल, मुथा हॉस्पिटल, कान्हे ग्रामीण रुग्णालय, स्पर्श हॉस्पिटल, पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच सदर वाहन चालकास वडगाव मावळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.