मावळ तालुक्यातील भडवली गावात सार्वजनिक कार्यक्रमात ३० ते ४० लोकांना विषबाधा
पवनानगर – मावळ तालुक्यातील भडवली गावात सार्वजनिक कार्यक्रम दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पार पडला . कार्यक्रमानंतर सार्वजनिक भोजनाची व्यवस्था केली होती, त्यातुनच ३० ते ४० लोकांना विषबाधा (फुड पॉझनींग) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार या गावातील नागरीकांनी सार्वजनिक भोजनाचा लाभ घेतला होता. त्यात लहान मुले, पुरुष, महिला, वयस्कर नागरिक होते.
आज सकाळी १० ते १०:३० च्या दरम्यान भडवली गावातून पवनानगर येथील सरकारी रुग्णालयात फोन आला की गावातील नागरीकांची प्रकृती खराब झाली आहे, असे कळताच रुग्णालयात रुग्णवाहिकातून नागरीकांना आणण्यात आले.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालय पेशंट भरती करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती, सर्व पेशंटचे बिपी (रक्त दाब) कमी झाला होता, काही जणांना उलट्या तर काही जणांना जुलाब व पोट दुखी तर काहींना हे सर्व होत होते.
नागरीकांची प्रकृती आता बरी आहे तर काही नागरीकांची प्रकृती चिंताजनक आहे ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना पुण्यातील औंध येथील रुग्णालय हलवण्यात आले आहे. तसेच पवनानगर येथील रुग्णालयातील तीन वॉर्ड फूल झाले असल्याने काही रुग्ण कान्हे येथील रुग्णालय पाठवले गेले आहेत.
वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर इंद्रनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाटील, डॉ. विश्वधर सोनवणे, डॉ. पोपट आधाते, डॉ. शिवराज वाघमारे, रुग्णांचे उपचार करत आहेत. तसेच या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस व वडगाव मावळचे पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.
पत्रकार – सागर घोडके
पुणे मावळ