काटोल आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचंआंदोलन तीव्र! सर्व संपीरी कर्मचार्यांनी काढला सहकुटुंब मागणी मोर्चा आगारापासून -तालुका कार्यालयावर धडकला मोर्चा 310कर्मचार्यांची आपल्या1200 कुटूंबीयांसह तालुका कार्यालयावर धडक

बाॅक्स
{महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या काटोल आगारातील 100टक्के कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आपल्या मागण्या मान्य करन्या साठी संप पुकारला आहे. या संपामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी बसेसचा आधार घ्यावा लागत असून खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांनी एस टी चे कामगारांना कामवार रूजू होण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र एस टी कामगारांचे आंदोलनात राज्याचे विरोधी पक्ष भाजप व सहयोगी पक्षांनी उडी घेतल्याने एस टी कामगारांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हें दिसु लागले आहे. याचा प्रत्यय 12नव्हेंबर रोजी सकाळी 11-00वाजता नागपुर विभागातील काटोल आगारातील 100%कर्मचार्यांनी सहकुटुंब मागणी मोर्चाचे आयोजन करून हा सह कुटूंब मोर्चा काटोल आगारापासून तर काटोल तालुका कार्यालयावर धडकला.}
काटोल-
राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नागपुर जिल्ह्यातील काटोल आगारातील 100% कर्मचार्यांनी सात नव्हेंबर चे मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपात उतरले. जिल्ह्यात सर्वच आगारातून एसटी वाहतूक बंद झाली असून प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत.
मागील सहा दिवसापासून असलेला संप चिघळला असून कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय एस.टी.चे सर्वच कर्मचारी व सर्वच संघटना उत्फुर्तपण संपात उतरले आहेत. काटोल बस स्थानकातील सर्वच कामगार( चालक, वाहक, यांत्रिकी कामगार, लिपिक वर्ग)आप आपल्या कुटूंबीयांसह संपात उतरला आहे. सात नव्हेंबर पासून काटोल आगारातून एक ही एस टी बस
वाहने सोडण्यात आली. त्यानंतर एसटी वाहतूक बंद ठप्प झाली आहे.
नागपुर जिल्हा च्या सर्व आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत मागण्या केल्या. या संपामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी बसेसचा आधार घ्यावा लागत असून खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत.
काटोल आगारातील संपकरी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे आगारातील सर्व 48बससे आगारात प्रवासी वाहतूकीच्या प्रतिक्षेत उभ्या आहेत.
यातून आठवडाभरात काटोल आगाराला अंदाजे 20लाखाचे उत्पन्न बुडाले असल्याचे सांगितले जाते.
खाजगी प्रवासीवाहतूकदारांची चांदी
एस टी कर्मचार्यांच्या संपाचा फायदा उचलत खाजगी प्रवासीवाहतूकदारांनी काटोल नागपुर-कोंढाली-नरखेड-सावनेर मार्गावर दुप्पटीपेक्षा ज्यास्त भाडे आकारणी सुरू असल्याचे प्रवाशांनी सांगीतले आहे.