लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना देखील पद्मश्रीची घोषणा
Summary
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात १)रजनीकांत श्रॉफ, २)सिंधुताई सपकाळ, ३)गिरीश […]

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात
१)रजनीकांत श्रॉफ,
२)सिंधुताई सपकाळ,
३)गिरीश प्रभुणे,
४)नामदेव कांबळे,
५)परशुराम गंगावणे आणि ६)जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगावणे यांच्यासह १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अनेक अनाथांना आसरा देत अनाथांची माऊली अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्रीची घोषणा झाली आहे.सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. गिरीश प्रभुणे यांना देखील पद्मश्रीची घोषणा झाली आहे. लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना देखील पद्मश्रीची घोषणा करण्यात आली आहे.