मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेतून, एचडीएफसी कडून पोलिसांना कोट्यावधीच्या विम्यासह भरघोष ऑफर
मुंबई वार्ता: मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत जमा होणार आहेत. पोलिसांना एचडीएफसी बँकेकडून आता लाखो नाहीतर कोट्यावधीचा विमा संरक्षण मिळणार आहे.
एचडीएफसी ने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. या प्रस्तावानुसार पोलिसांना एचडीएफसी बँकेकडून आता लाखो नाहीतर कोट्यावधींचे विमा संरक्षण मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 मध्ये ॲक्सिस बँकेतून मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता . या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. त्यानंतर नवीन बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार भरघोस ऑफर देणाऱ्या एचडीएफसी बँकेची निवड करण्यात आली. पोलिसांना एचडीएफसी बँकेकडून खालील सुविधा मिळणार आहे.
१) अकरा लाखांच्या विम्या सह कुटुंबातले पाच सदस्य झिरो बॅलन्स खाते उघडू शकतात.
२) नैसर्गिक किंवा कोविद मुळे मृत्यू झाल्यास दहा लाखाचे विमा संरक्षण.
३) अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी पर्यंत विमा कवच.
४) अपघातात अपंगत्व आल्यास 50 लाखाचे विमा कवच.
५) अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १०लाख शिक्षणासाठी.
६) रुग्णालयात उपचारासाठी भरती झाल्याचे तीस दिवसापर्यंत प्रतिदिन एक हजार रुपये मदत.
वरील भरघोष ऑफर मुळे पोलीस विभागाने मुंबई पोलिसांचे पगार जमा करण्यासाठी एचडीएफसी बँकेची निवड केलेली आहे. यामुळे मुंबई पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर