जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था ब्रम्हपुरीच्या संचालक मंडळाच्या घोटाळ्याप्रकरणी फेरचौकशीचे जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित ब्रम्हपुरी र. नं. १००२ या पतसंस्थेतेत गैरव्यवहार प्रकरणी पतसंस्थेचे सभासद जयगुरु मेश्राम व शेकडो सभासद यांनी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, ब्रम्हपुरी यांचेकडे लेखी तक्रार करुन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांनी गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सहकार अधिकारी श्रेणी – २ के. डी. पिल्लेवान यांची नियुक्ती केली होती. परंतु चौकशी अधिकारी यांनी संचालक मंडळ यांनी केलेल्या व सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये लाभांश पात्र सभासद यांना भेटवस्तू देण्याची तरतुद नाही असे असताना व त्याबाबत सहाय्यक उपनिबंधक यांनी २९ जुलै २०२१ ला तसे पत्र तक्रार कर्त्या सभासद यांना लेखी दिले होते. तसेच आमसभेची मंजुरी न घेताच संचालक मंडळ यांनी दुकानदाराला वस्तूचे आगावु रक्कम देण्यात आली. तसेच पतसंस्थेतेतील कर्मचारी यांना अधिलाभांश देण्याची सुद्धा तरतुद नाही. तसेच आनलाईन आमसभेत उपस्थित सभासद यांना उपस्थिती भत्ता देण्याची सुद्धा तरतूद नाही. असे असतांना संचालक मंडळयांनी संस्थेची आर्थिक नुकसान केली असतांना चौकशी अधिकारी के. डी. पिल्लेवान यांनी आपल्या १५ सप्टेंबर २०२१ च्या चौकशी अहवालात संचालक मंडळ यांना क्लिन चिट दिली.
त्या चौकशी अहवालाची फेरचौकशी व्हावी यासाठी जयगुरु मेश्राम व इतर सभासद यांनी प्रहार शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक मान. प्रशांत धोटे यांची भेट घेऊन फेर चौकशी करुन दोषीं संचालक मंडळ यांच्यावर सहकारी अधिनियम ८३ अन्वये चौकशी करुन बोगस चौकशी अहवाल सादर करणार्या के. डी. पिल्लेवान यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असे निवेदन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर यांना देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल जिल्हा उपनिबंधक यांनी घेऊन एस. एस. तुपट, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था सावली यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ७ दिवसाच्या आत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी आपल्या २० ऑक्टोबर २०२१ च्या पत्रात नमुद केले आहे.
या घोटाळ्याची दखल सहकार मंत्री नाम. बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा घेतली आहे. येणाऱ्या नागपूरच्या हिव्हाळी अधिवेशनात नाम. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री यांना भेटुन संचालक मंडळ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे असे तक्रारकर्ते जयगुरु मेश्राम व इतर सभासद तसेच प्रहार तालुका अध्यक्ष मुन्ना उर्फ अरविंद येरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.