अन्न औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणे वेळच नाही, कारण इकडे वसुली सुरू आहे?

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
जिल्ह्यातील अन्न औषधी प्रशासन नेमके काय करताहेत ? हेच अजून पर्यंत जिल्ह्यातील जनतेला कळले नसून जिथे जिल्ह्यात खुलेआम खर्रा सुरू आहेत अर्थात सुगंधित तंबाखू ची खुलेआम विक्री सुरू आहे पण तिथे या अन्न औषधी प्रशासन विभागाच्या धाडी होत नाही तर पोलीसानी सुगंधित तंबाखू पकडला की लगेच हे घटनास्थळी जातात जणू काही यांनीच सुगंधित तंबाखूचा साठा पकडला आहे. त्यानंतर ते पकडलेला मालाची पाहणी केल्यानंतर पोलिस स्टेशन मधे याबाबत तक्रार देतात पण आता मात्र उलटी गंगा वाहायला लागली असून राजुरा पोलीसानी सुगंधित तंबाखू ची गाडी चक्क दोन दिवसा अगोदर पकडल्या नंतर सुद्धा हे अन्न औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी राजुरा इथे पोहचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने आता या विभागाचे अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे सिद्ध होत आहे. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे असून काल दिनांक 28 ओक्टोंबर ला ह्याच अधिकाऱ्यांना चंद्रपूर शहरातील सुगंधित तंबाखू विक्रीची दुकाने सोडून बाकी दुकानावर कारवाई करण्याची तीन तीन तास वेळ होती.त्यामुळे आता या विभागाच्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू विक्रीला हेच अधिकारी कारणीभूत आहेत हे एकदा सिद्ध व्हायला चांगली संधी आहेत. पण मागील दोन दिवसापासून पकडलेला सुगंधित तंबाखुचा साठा कारवाई बिना असाच पडून असल्याने राजुरा पोलीसानी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात सुगंधित तंबाखू चा अवैध व्यापार वसीम,जयसूख, मनसूख, हरीश, जितू ठक्कर आणि गणेश गुप्ता व त्याची गैंग करत असताना अन्न औषधी विभागाचे अधिकारी हे त्याना पकडण्याचा प्रयत्न न करता त्यांच्याकडून दरमहा लाखो रुपयाची वसुली करत असल्याची चर्चा होती, दरम्यान वसीम चा जवळपास 4 लाखाचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी पकडला तर त्या वसीम वर फौजदारी गुन्ह्यासह अन्न औषधी विभागाच्या कायद्यानुसार अनेक कलमा दाखल करण्यात आल्या तर दुसरीकडे गणेश गूप्ताला अवैध सुगंधित तंबाखू विकण्याची खुली सूट देण्यात आली होती पण त्याचे नशीब फुटके होते आणि त्यामुळे त्याचा माल भंडारा गोंदिया या जुळ्या जिल्ह्यात सापडला तर आता राजुरा येथे पकडलेला सुगंधित तंबाखू सुद्धा गुप्ताचाच असल्याची चर्चा आहे म्हणून कदाचित अन्न औषधी विभागाचे अधिकारी गुप्ता चा माल आहे म्हणून तर राजुरा येथील सुगंधित तंबाखू संदर्भात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत नसेल?अशी दाट शंका आता व्ह्यायला लागली आहे.