BREAKING NEWS:
नागपुर

पोलीस स्टेशन जवळील किराणा दुकानाचे कुलुप तोडुन १७ हजार रूपयाची चोरी.

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपरिषद कार्यालय जवळील फुटपाथ वरील लोंखडी ठेल्यातील किराना दुकानाचे कुलुप तोडुन गल्यातील नगदी एकुण १७ हजार रूपये अज्ञात चोराने चोरी केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला […]

कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपरिषद कार्यालय जवळील फुटपाथ वरील लोंखडी ठेल्यातील किराना दुकानाचे कुलुप तोडुन गल्यातील नगदी एकुण १७ हजार रूपये अज्ञात चोराने चोरी केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गोलु शिवलाल यादव वय ३१ वर्ष राह. न्यु मार्केट नगरपरिषद कन्हान-पिपरी जवळ राहत असुन नगर परिषद कार्यालय जवळील फुटपाथावरील किराना सामानाची लोंखडी टपरी दुकान आहे. ही दुकान मित्र प्रकाशसिह कुवरसिह बिस्ट राह धरमनगर कन्हान यास चालविण्यास दिली असल्याने तो ही किराना टपरी दुकान सकाळी ६.३० वाजता उघडुन दुपारी १२ वाजता बंद करून परत दुपारी २ वाजता उघडुन रात्री ८ वाजता बंद करतो. सोमवार (दि.२५) ऑक्टोबंर ला रात्री ८ वाजता बंद करून आपल्या घरी गेला. दुस-या दिवसी मंगळवार (दि.२६) ला सकाळी ६.३० वाजता दुकान उघडण्यास गेला असता किराना टपरी दुकाना चे कुलुप तुटलेले दिसल्याने आत पाहिले तर कॉऊंटर मध्ये ठेवलेले १ रूपयाचे सिक्के ३५०० रूपये, ५ व १० चे सिक्के १५०० रू.आणि नोटे १२००० रू. असे एकुण १७००० रूपये अज्ञात चोराने चोरून खाली गल्ला दुकानातच फेकुन पसार झाल्याने फिर्यादी गोलु यादव यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात चोरा विरूध्द अप क्र ३९८/२१ कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस निरिक्षक संजय काळे यांचे मार्गदर्शनात पोउपनि महादेव सुरजुसे पुढील तपास करित आहे.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *