कोरोना व्हायरस (COVID-19) चा वाढ़ता संसर्ग लक्षात घेता
अंकुश उराडे / पोम्भूर्णा तालुका प्रतिनिधि
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उमरी गावात समाजिक अंतर चे पालन करुण घेन्यात आले. आरोग्य सुरक्षेविषयी खास जबाबदारी म्हणुन ही काळजी घेन्यात येत आहे. आणि तोच एक पाऊल समोर टाकत ठाणेदार नितावने यांनी गावातील प्रत्येक दुकानामध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी एक-एक मिटर अंतरावर डब्बे आखवेत अशी शिपारस (मेडिकल, किराणा स्टोअर्स , पानठेला, हाॅटेल सलुन, टेलर ..) दुकानदारांना देण्यात आली. अजुन पर्यंत तर कोरोना ची लस आली नाही ती येई पर्यंत नागरिकांनाी स्वतःची काळजी स्वतःला च घ्यावी लागत आहे, त्यामुळे सध्या तरी लोंकाना कोरोना वर मात करन्यासाठी सामाजिक अंतर चे पालन करुण स्वतःची काळजी स्वतः घेणे हे अत्यंत गरजेचे आहे . ठाणेदार प्रदीपकुमार नितवने उप पोलिस स्टेशन उमरी पोतदार यांच्या माध्यमातुन हे कार्य समोर आले. नितवने सरांनी गावातील लोकांच्या हितासाठी केलेले हे कार्य खरचं अभिनास्पद वाटतयं,कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस लोकांसाठी काम करणाऱ्या कोरोनायोद्धा पोलीसांना त्यांच्या या कार्यास प्रतिसाद देत दुकानदार सहकार्य करित आहे.गावतील लोक प्रशाक्षनाला सहकार्य करावे व सुचनाचे पालन करावे , सामाजिक अंतर राखून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. अशी ठोस भूमिका ठाणेदार प्रदीपकुमार नितवने (उप पोलिस स्टेशन उमरी पोतदार) यांनी केली.