कन्हान येथे महात्मा राजा रावन मडावी यांचे थाटात पुजन (गोंगो) केले
कन्हान : – गोंगपा व आदीवासी समाजा व्दारे तिरू रमेश ईरपाते यांचे निवास स्थान कन्हान येथे महात्मा राजा रावन मडावी यांचे थाटात पुजन (गोंगो) करण्या त आले.
शुक्रवार (दि.१५) ला गोंगपा व आदीवासी बांध वा व्दारे तिरू रमेश (बंडु) ईरपाते यांचे निवास स्थान कन्हान येथे महात्मा राजा रावन मडावी, फडापेन व धर्मगुरू पहांदी कुपार लिंगो यांच्या प्रतिमेला गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष तिरू सुखलाल मडावी , गोंगपा कन्हान शहर अध्यक्ष तिरू सोनु मसराम,तिरू रमेश ईरपाते यांच्या हस्ते गोंडी संस्कृती नुसार गोंगो (पुजन) व माल्यार्पण करून फडापेन सुमरण करण्या त आले. याप्रसंगी कन्हान नगरसेवक राजेश यादव, तिरू शंकरभाऊ ईनवाते, तिरू संदीप परते, तिरू अनि ल भाऊ पंधराम, तिरू अंनतराम टेकाम, तिरू पप्पु मरकाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महा. उपाध्यक्ष तिरू सुखलाल मडावी यांनी महात्मा राजा रावन यांनी आदीवासी चे राज्य प्रस्थापित करून समाज हिताचे कार्य केल्याने आजही देशात काही भागात आदीवासी बांधवा व्दारे त्यांचे पुजन करण्यात येते. जस जसा हा आदीवासी समाज शिक्षित व जाग रूक होईल तस तशे महात्मा रावनाचे महत्व समाजा ला माहीत होईल आणि तशी राजा रावन पुजा ही वाढ त जाईल असे समाजाचे प्रबोधन केले. तदंतर तिरू संदीप भाऊ परते हयानी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समापन केले. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता तिरू रामलाल पट्टा, तिरू राजेश टेकाम, तीरू राजविर मडावी, तिरू कवडु ईनवाते, तिरू बाबु राव ईनवाते, तिरू सुरज वरखडे, तिरू अनिल मरस्को ल्हे, तिरू सचिन ईरपाते, तिरूमाय योगिता ईरपाते, तिरूमाय सोनम ईरपाते, तिरूमाष गिताबाई ईरपाते आदी सह समाज बांधवानी उपस्थित राहुन अथक परिश्रम घेतले.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535