महावितरणचे तीन विभागातील तांत्रिक कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत
नागपूर शहर वार्ता:- नागपुर शहरातील महावितरणने महाल,गांधीबाग,सिव्हिल लाईन हे 2011 ला SNDL ला सुपूर्त केले ,त्यावेळी 1050 तांत्रिक कर्मचारी कार्यरत होते.आणि परत 2019 ला SNDL ने हे तिन्ही विभाग महावितरणला परत केले त्यावेळी सुद्धा 1050 कर्मचारी होते,मात्र महावितरण त्या कर्मचाऱ्यापैकी 842 च घ्यायांचे असे ठरविले,परंतु 2011 ला उपभोक्ता संख्या 3,91,000 होती व 2019 ला 5,77,000 आहेत ,म्हणजेच उपभोक्ता संख्या वाढली,तसेच पायाभूत सुविधेत 2011 च्या तुलनेत 47%ने वाढ झाली,त्यामुळे कर्मचारी संख्या वाढायला हवी, पण महावितरण ती 200 ने कमी करत आहे .यामुळे सामान्य जनतेला त्रास होईल मागणी वाढेल सेवा देऊ शकणार नाही ,जनतेचा रोष वाढेल.
म्हणून मी किशोर कुमेरिया ,महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब आणि मा.ऊर्जा मंत्री यांना निवेदन करतो की, जनतेचा रोष कमी करण्यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी, किमान 2011 ची कार्यरत 1050 पदे कायम करण्यात यावी.
किशोर कुमेरिया
माजी उपमहापौर,नगरसेवक,गटनेता मनपा,नागपूर