क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ आज कन्हान बंद
कन्हान : – उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना चिरडुन टाक ण्याचा निषेधार्थ संपुर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे आवा हन करण्यात आल्याने कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी द्वारे “कन्हान बंद” करण्याचे आयोजन करण्यात आले असुन व्यापा-यानी व नागरिकांनी या क्रुर हत्याकांडा चा निषेधार्थ दुकाने बंद ठेवुन सहकार्य करावे असे आवाहन शहर अध्यक्ष राजेश यादव व महाविकास आघाडी कन्हान च्या पदाधिका-यांनी केले आहे.
देशातील शेतकऱ्यांवर केंद्र सरकार व सत्ताधारी भाजपा सरकार सातत्याने अन्याय अत्याचार करीत असुन यांचे कृत्य हुकुमशहा हिटलर व मुसोलीनीलाही लाजवणारे असुन शेतकऱ्यांना सामुहिकरित्या चिरड ण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी असुन या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या काॅंग्रेस महिला नेते प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबुन इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे. अश्या क्रुर भाजप सरकार च्या विरोधात देशभर आंदोलन सुरु असुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने आज सोमवार (दि.११) ऑक्टोंबर २०२१ ला ” महा राष्ट्र बंद” चे आवाहन केल्याने कन्हान येथे काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर व महाविकास आघाडी च्या पदाधिका-यांनी ” कन्हान बंद ” करण्याचे आयोजन करण्यात आले असुन व्यापारांनी व नागरिकांनी या क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ दुकाने बंद ठेवुन सहकार्य करावे असे आवाहन कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव व महाविकास आघाडी कन्हान च्या पदाधिका यांनी यांनी केले आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535